Vidarbh24News

Latest Online Breaking News

बाबासाहेब वासनिकांनी अवघ्या तासभरात ५ कि. मी. सागर पोहला

जिल्हा पोलीस दलात कार्यरत जवानाची कामगिरी

गडचिरोली  – अवघ्या १ तास ८ मिनिटे २२ सेकंदात तब्बल ५ किलोमिटरचा समुद्र पोहण्याची शर्यत जिंकण्याचा मान गडचिरोली जिल्हा पोलिस दलात कार्यरत जवान बाबासाहेब वासनिक यांनी मिळविला आहे. असा पराक्रम करणारे ते गडचिरोली जिल्हा पोलिस दलातील पहिले जवान आहेत. त्यांच्या या उत्कृष्ट कामगिरीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

स्विमिंग फेडरेशन ऑफ इंडिया व महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने १२ फेब्रुवारीला मुंबई येथे समुद्र पोहण्याची राज्यस्तरीय स्पर्धा घेण्यात

आली. लाईट हाऊस ते गेट वे ऑफ इंडिया पर्यंतचा पाच किलोमिटरचा टप्पा यासाठी ठेवण्यात आला होता. २५ ते ४५ या वयोगटातील राज्यभरातील तब्बल ५५० स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले होते.

यामध्ये गडचिरोली जिल्ह्यातून एकमेवरित्या पोलिस कर्मचारी बाबासाहेब वासनिक यांनी सहभाग घेतला होता.

अतिशय मेहनतीने त्यांनी अवघ्या १ तास ८ मिनिटे २२ सेकंदात हा पाच किलोमिटर समुद्र पोहण्याचा टप्पा पार केला. या स्पर्धेत त्यांना दहावा क्रमांक मिळाला. यासाठी त्यांना मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात प्रमाणपत्र, मेडल आणि गिफ्ट देऊन सन्मानित करण्यात आले.

गडचिरोली जिल्हा पोलिस दलात कार्यरत असलेले बाबासाहेब वासनिक हे गडचिरोली तालुक्यातील मुळखळा गावातील रहवासी आहेत. सन २०११ मध्ये वयाच्या १९ व्या वर्षी त्यांची गडचिरोली पोलिस दलात निवड झाली. त्यांनी आपले वडिल विलास शंकर वासनिक यांच्या मार्गदर्शनात गडचिरोली शहरातील कॉम्प्लेक्स परिसरातील क्रीडा संकुलातील जलतरण तलावात पोहण्याचा सराव सुरू केला.

जिल्हा पोलिस दलाच्या विशेष अभियान पथकात कार्यरत असतांनाही त्यांनी जलतरणाचा सराव सोडला नाही. दरम्यानच्या काळात प्रतिनियुक्तीवर त्यांची व्हीआयपी सेक्युरिटी फोर्समध्ये नियुक्ती झाली. त्यावेळी २०१८ मध्ये झालेल्या मालवन येथील तीन किलोमिटरच्या पोहण्याच्या स्पर्धेत त्यांनी सहभाग घेऊन जिल्ह्याचे नाव उंचावले होते. वासनिक यांनी आत्तापर्यंत विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन अनेक सुवर्णपदक पटकावले आहे. विशेष म्हणजे, समुद्रामध्ये जलतरण करणारे बाबासाहेब वासनिक हे गडचिरोली जिल्हा पोलिस दलातील प्रथम व्यक्ती आहेत. त्यांनी आपल्या यशाचे श्रेय पोलिस महानिरिक्षक क्रिष्णप्रकाश, पोलिस अधिक्षक निलोत्पल, उपविभागीय पोलिस अधिकारी साहिल झरकर, पोलिस निरीक्षक वाकडे, श्रीपाद बलकी, बाळु रामटेके, मंगलसिंग राठोड, सचिन राऊत यांना दिले आहे.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!