स्कूटीवर ट्रक उलटला,एक महिला ठार, तर दुसरी गंभीर जखमी,
स्कूटीवर ट्रक उलटला,एक महिला ठार, तर दुसरी गंभीर जखमी,
विदर्भ 24 न्यूज़
जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली/
कुरखेडा:- येंगलखेडा येथून धानाचे पोते घेऊन जाणारा ट्रक बाजूने जाणाऱ्या स्कूटीवर उलटल्याने एक महिला जागीच ठार, तर दुसरी गंभीर जखमी झाली. दिनांक १३ जून रोजी संध्याकाळी ६ वाजताच्या सुमारास कुरखेडा मालेवाडा मार्गावरील शिवणी गावाजवळ ही घटना घडली. संगीता विनोद गजपुरे ( ३५ ) असे ठार झालेल्या , तर शारदा कोरेत ( २५ ) असे गंभीर जखमी असलेल्या महिलेचे नाव आहे . शारदा कोरेत ही मालेवाडा वनपरिक्षेत्रात वनरक्षक पदावर कार्यरत आहे. ती संगीता गजपुरे यांच्या वडिलांच्या घरी भाड्याने राहते. आज शारदा कोरेत व संगीता गजपुरे या स्कूटीने कुरखेडा येथून मालेवाडा गावाच्या दिशेने जात असताना ट्रक शिवणी गावाजवळ स्कूटीवर उलटला. यात स्कूटीवर मागे बसलेली संगीता गजपुरे ट्रकच्या चाकाखाली आल्याने जागीच गतप्राण झाली, तर शारदा कोरेत ही बाहेर फेकल्या गेल्याने गंभीर जखमी झाली. कुरखेडा येथील उपजिल्हा रुग्णालयात प्रथमोपचार केल्यानंतर तिला गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे. धडक देणारा ट्रक आदिवासी विकास महामंडळाने खरेदी केलेले धानाचे पोते घेऊन येंगलखेडा येथून कुरखेड्याच्या दिशेने जात होता. कुरखेडा पोलिस घटनेचा तपास करीत आहेत .



