चॉकलेट डे साजरा करणे बेतले जिवावर
चॉकलेट डे साजरा करून परतणाऱ्या युवक युवती अपघातात ठार
सिंदेवाही पासून 6 किमी अंतरावर सरडपार येथे एका अज्ञात वहनाच्या धड़केत एक युवक एक युवती असे दोन ठार तर एक युवक गंभीर जख्मी झाल्याची घटना घडली.घटना आज दिनांक ९/२/२०२३ रात्रो ८:३० वाजताच्या सुमारास झाली.
सविस्तर वृत्त असे की सिंदेवाही तालुक्यातील सरडपार या गावा लगत एका अज्ञात वाहनाने स्कूटीला धड़क दिल्याने मूल तालुक्यातील राजोली येथील कु. सेजल अनिल कुंभारे वय 20 वर्ष व सुमित अलोने वय 23 रा. डोंगरगाव ता.मूल हे दोघे जागिच ठार झाले.

अक्षय लेनगुरे रा.डोंगरगाव ता.मूल हा गंभीर जख्मी असून त्याला सिंदेवाही येथील ग्रामीण रुग्णालय येथे प्राथमिक उपचार करुन जिल्हा रुग्णालय चंद्रपुर येथे रेपर करण्यात आले. पुढील तपास सिंदेवाही पुलिस स्टेशन चे नव नियुक्त ठानेदार तुषार चव्हाण करीत आहे.
अज्ञात वाहनावर गुन्हा दाखल केला असून अज्ञात वाहनाचा शोध सिंदेवाही पोलिस करीत आहे.



