*विश्वशांती विद्यालयात जागरूक पालक व सुदृढ बालक उपक्रम*
तालुका वैद्यकीय अधिकारी कार्यालय आणि ग्रामीण रुग्णालय सावली यांच्या संयुक्त विद्यमाने विश्वशांती विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय सावली येथे दिनांक ९ फेब्रुवारी२०२३ रोजी विद्यार्थ्यांसाठी जागरूक पालक व सुदृढ बालक हा उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुरचित्रवाणी समाजाच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला वर्ग पाच ते वर्ग बारावीच्या विद्यार्थ्याची संपूर्ण आरोग्य तपासणी व आरोग्य मार्गदर्शन करण्यात आले.
आयोजित उपक्रमाला नगरपंचायत सावलीचे नगराध्यक्ष लताताई लाकडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. वाघधरे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. धनश्री मर्लावार, वैद्यकीय अधिकारी डॉ. विकास नेत्तूलवार, डॉ. विश्वास डॉ. दीपक जोगदंड, कृष्णाजी भिमनवार, गजानन मेश्राम शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र मुप्पावार यांची उपस्थिती होती.