पारडी येथे तीन दिवशीय वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यस्मृती महोत्सव व सर्व संत स्मृर्ती महोत्सव ……
सावली ( लोकमत दुधे )
अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ पारडी च्या वतीने हनुमान मंदिराच्या च्या पटांगणावर तीन दिवशीय वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा ५४ वा पुण्यस्मरण महोत्सव व सर्व संत मानवता दिन कार्यक्रम दिनांक १फेब्रुवारी ते३फेब्रुवारी ला घेण्यात आला
या तीन दिवसीय कार्यक्रमामध्ये ग्राम सफाई, घट स्थापना, दिप प्रज्वलन, रांगोळी स्पर्धा, ग्रामगीता वाचन स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, गीत गायन स्पर्धा, जनजागृती रॅली ,रामधून काढण्यात आली आणि या स्पर्धे मध्ये प्रथम, द्वितीय आणि तृतीय बक्षिसे देण्यात आले.
तसेच महिलांच्या उपस्थितीत हळदी कुंकू कार्यक्रम घेण्यात आले त्या नंतर रात्रौ भजन, कीर्तन घेण्यात आले
या कार्यक्रमामध्ये गरीब विद्यार्थ्यांना, पुरुष, महिलांना भैयाजी मिरगे महाराज भद्रावती यांचे कडून आर्थिक मदत देण्यात आले
शेवटी गोपाळ काला करून उपस्थित पाहुणे आणि गावकर्यांना जेवण देऊन कार्यक्रमा ची सांगता केली.
या कार्यक्रमाला उपस्थित म्हणून संत मुरलीधर स्वामी महाराज हरणघाट, अनिल पित्तलवार, गावाचे सरपंच बंडू मेश्राम, उपसरपंच पारस नागापुरे,रवी गेडेकर तमुस अध्यक्ष पारडी, ग्राम विकास अधिकारी पी. टी. पारधी,केदार नागापुरे,सारिका भोयर,नीता नरुले, ज्योती पाल, सुनीता शेंडे, साईनाथ चरडुके से.स. सो. अध्यक्ष पारडी, मोरेश्वर पाल शा. व्य. समिती सभापती पारडी, तुळशीराम घोडमारे,खोब्रागडे मुख्याध्यापक शाहिद सुरेश पाटील सुरकर विद्यालय
कवठी,डॉनिअल देवगडे मुख्याध्यापक पारडी, विजय पोलजवार सह. शिक्षक, संतोष वडपल्लीवार सह. शिक्षक,हजारे शिक्षक, , शेखर प्यारमवार, मुक्तेश्वर राजूरकर, सुफले सर, ,भैयाजी मिरगे महाराज, छाया शेंडे माजी पंचायत समिती सभापती,आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आदींची उपस्थिती होती …..



