स्वच्छ अभियानात दुसरा क्रमांक मिळविलेल्या घोडेवाहीत धुळीचे साम्राज्य …..
* घोडेवाहीतील आतील, बाहेरील रस्ते धुळखात *
* व्यथा गाव तिथे स्वछतेची *
सावली ( बाबा मेश्राम/लोकमत दुधे )
स्वच्छ अभियान स्पर्धेत जिल्हा परिषद चंद्रपूर ,पंचायत समिती सावली अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायत घोडेवाहीने दुसरा क्रमांक मिळविला ,परंतु याच घोडेवाही गावातील आतील व बाहेरील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे, सर्व रस्ते धुळीने माखलेले दिसून येत असताना मात्र अशा बाबींकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे,
महाराष्ट्र शासनाने संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता व राष्ट्र संत तुकडोजी महाराज स्वच्छता स्पर्धा घेण्यात आल्या,या स्वच्छ अभियानात चंद्रपूर जिल्ह्यातील पंचायत समिती सावली येथील ग्रामपंचायत घोडेवाही ने द्वितीय क्रमांक प्राप्त केला ,ग्रामपंचायतीने क्रमांक प्राप्त केल्याने ग्रामपंचायत घोडेवाही चे नाव जिल्ह्यासह राज्यात चमकले ,पण याच गावात सध्या धुळीने रस्ते माखलेले आहेत, सर्वत्र धुळच धुळ दिसत असल्याने त्याचा त्रास वयोवृद्ध सह नागरिकांना होत आहे, याकडे ग्रामपंचायतचे अक्षरशः दुर्लक्ष होत आहे, गट ग्रामपंचायत घोडेवाहीत ,सिंदोळा व घोडेवाही चा समावेश 3000 लोकसंख्या आहे यात, जवळपास 2000 लोकसंख्या हि घोडेवाही गावाची आहे, सोबतच ग्रामपंचायत मुख्यालय घोडेवाहीतच आहे,गावात सिमेंट क्रांक्रीटचे रस्ते तर काही साधे रस्ते आहे, या गावातुन कोंडेखल गावाकडे जाणारा रस्ता आहे, रस्त्यावरील धुळीने डोळे, चेहरा खराब होत आहे, सोबतच रस्त्यावरील दोन्ही बाजूस केर कचरा मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे, त्याचा त्रास ग्रामपंचायत प्रशासनाला दिसून न येणे,हे नवलच, गावकरी लोकांनी चर्चा केल्यावर नागरिकांनी ग्रामपंचायतचे दुर्लक्ष असल्याचे सांगितले ,याकडे स्थानिक प्रशासनाने त्वरीत लक्ष देऊन रस्ते स्वच्छ करावे अशी एकमुखी मागणी गाव वासिय करीत आहेत …..



