पंचायत समिती सावली अंतर्गत कर्मचारी क्रिडा व सांस्कृतिक स्पर्धा …..
पंचायत समिती सावली अंतर्गत कर्मचारी क्रिडा व सांस्कृतिक स्पर्धा …..
* विविध विभागाच्या २२ संघाचा समावेश *
सावली ( लोकमत दुधे )
कर्मचाऱ्यांवर दैनंदिन कार्यालयिन कामकजाचा ताण नेहमीच असतो.त्यामुळे त्यांच्या अंगी सुप्त गुण असूनही कला गुणांना वाव मिळु शकत.नाही त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या.कलागुणांना वाव,मिळावा,त्यांच्यात एकतेची भावना निर्माण व्हावी, या उदात्त हेतूने पंचायत समिती सावली च्या वतीने दोन दिवसीय क्रीडा.व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, आज.रोजी नुकताच योगी नारायण बाबा क्रिडा संकुल.येथे थाटात उद्घाटन करण्यात.आले ,यावेळी सावली पोलीस स्टेशनचे ठाणेदार आशिष बोरकर, गट विकास अधिकारी जगन्नाथ तेलकापल्लीवार,प.स सावली, गटशिक्षणाधिकारी खंडाळे, एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी प्रमोद जोनमवार, कृषी अधिकारी आडे, पंचायत समिति विस्तार अधिकारी ,एस,सी, देवतळे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी एम आर जी.स, भक्तदास आभारे , आदींची उपस्थितीती होती,.
पंचायत समिती सावली अंतर्गत आयोजित क्रीडा स्पर्धेत क्रिकेट ८संघ,व्हालीबाल ६संघ,कबड्डी ८संघ अशा विविध विभागाच्या कर्मचा-यांना खेळण्याची संधी मिळाली, क्रिकेट च्या, शिक्षण सावली बिट विरुद्ध व्याहाड बिट,तर व्हालीबाल ग्रामसेवक संघ विरुद्ध शिक्षण विभाग तर कबड्डी आरोग्य विभाग महिला विरुद्ध शिक्षण विभाग महिला असे सामने खेळविण्यात आले, या निमित्ताने सावली येथील नागरिकांनी या क्रिडा स्पर्धेचा लाभ घेतला.
.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन खंडाळे ,तर आभार प्रदर्शन संजीव देवतळे यांनी केले, कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पंचायत समिती सर्व कर्मचारी यांनी मौलाचे सहकार्य केले …..