आगीत घर जळून झाले खाक
आगीत घर जळून झाले खाक
आमदार विजय वडेट्टीवारांचा मदतीचा हात
सावली तालुक्यातील गेवरा( खुर्द) येथील भूमिहीन,शेतमजूर ,गरीब पांडुरंगजी बानबले यांच्या घरला सुमारे संध्यकाळी ७:०० वाजता आगीने पेट घेतला व संपूर्ण घर आगीत ध्वस्त झाले.यात त्यांची आयुष्यभराची कमाई,मालमत्ता क्षणात जळून खाक झाली.सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
प्रसंगावधान गावातील लोकांनी आग विजवली तो परंत सर्व जळून राख झाले होते.त्यांचा या घटनेची माहिती गेवरा( खुर्द)येथील काँग्रेस कमिटीचे कार्यकर्ते आकाश येनप्रेड्डीवार,अंकुश येनप्रेड्डीवार व हंसराज रामटेके यांनी सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नितीन गोहणे यांना दिली.
त्यांनी क्षणाचाहि विलंब न करता तात्काळ मा.आमदार विजय वडेट्टीवार यांच्याशी संपर्क साधून तालुकाध्यक्ष नितीनजी गोहने यांचा प्रयत्नातुन आगीत घर ध्वस्त झालेल्या कुटंबियांनाआर्थिक मदत आणी अन्यधान्य व कपडे,ब्लॅॅकेट नितीनजि गोहने यांच्या हस्ते त्यांना प्रदान करण्यात आले.
या वेळी गेवरा खुर्द येथील काँग्रेस कार्यकर्ते व समस्त गावकरी उपस्थित होते.



