नारायण ईप्पावार यांचा सेवानिवृत्तीपर सत्कार
गडचिरोली जिल्हा हिवताप कार्यालयीन कर्मचारी तथा जिल्हा हिवताप पतसंस्थेचे संचालक नारायण ईप्पावार यांचा सेवानिवृत्तपर निरोप समारंभाचा कार्यक्रम दिनांक ३१/०१/२०२३ ला जिल्हा कार्यालयात आयोजीत करण्यात आला होता. त्यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कार्यालयीन प्रमुख डॉ. कुणाल मोडक जिल्हा हिवताप अधिकारी उपस्थित होते. नारायण ईप्पावार यांनी सन १९९१ ते २०२३ पर्यंत निःस्वार्थपणे अव्याहत ३२ वर्षे आयोग्य विभागात सेवा दिली.

.कार्यक्रमाच्या शेवटी सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांकडून पुढील आयुष्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी एस.एम. भार्गवे, कार्यालय अधिक्षक, कुणाल वाणी, बि. एन. सोनवणे, ए. पि. एडलावार, पि. गी. बारसागडे, के. एस. राउत, डी. के. कुनघाडकर, अशोक पवार, निकेत गंदेवार, अतुल मेश्राम, संजय समर्थ, पि. ए. सयाम, आर. आर. कार्लेकर, वैशाली कोसनकर, ए. एस. गोपेवार, गणेश शेळके, निरज बिरा, रमेश मोहुर्ले इत्यादी आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.



