जीर्ण ईमारतिमुळे ४४ विद्यार्थी एकाच वर्गखोलित

जीर्ण ईमारतिमुळे ४४ विद्यार्थी एकाच वर्गखोलित ……
* जि प प्राथमिक शाळा चारगांव ची व्यथा *
* वर्ग १ ते वर्ग ४ चा समावेश *
*संबंधित विभागाचे दुर्लक्ष *
सावली ( लोकमत दुधे )
शाळा ईमारतिच्या कमतर तेमुळे एकाच वर्ग खोलीत एक ते चार वर्गातिल ४४ विद्यार्थ्याना एकाच खोलीत शिक्षण घेण्याची वेळ गेली तीन वर्षा पासून निर्माण झाली असताना शिक्षणाच्या आशा गंभीर बाबिकडे कुणाचे लक्ष असू नये याबाबत शंका व्यक्त केलि जात आहे स्थानीक प्रशासना सह वरिष्ठ अधिकारी या संदर्भात वरिष्टाकडे पाठपुरावा केला गेला असल्याचे सांगत असले तरी मग तीन वर्षा पासून ही समश्या का आसा प्रश्न उपस्थित केला जात आहे ग्रामीण भागातील विद्यार्थ्याना शिक्षणाची संधि निर्माण व्हावी म्हणून गाव तिथे शाळेचि निर्मिति करण्यात आली आज ज्या ठिकाणी शाळा आहे आशा ठिकाणी विद्याथी नाही किव्हा विद्याथी असले शिक्षक नाही शिक्षक असले तर वर्गखोल्या नाही अशी अवस्था निर्माण झाली आहे त्यामुळे मराठी शालेकडे निर्माण होणारा कल कमि होत आजच्या घडिला ईग्रजी शिक्षणाकडे सर्वांचा कल गेलेला दिसत आहे त्यामुळे मराठी शाळा बंद होण्याचा मार्ग मोकळा होताना दिसतो तालुक्यातील जवळच असलेल्या चारगांव जि प शाळेत जीर्ण इमारतीमुळे एकांच वर्गात १ ते ४ वर्गातिल ४४ विद्यार्थ्याना शिक्षण घेण्याची वेळ निर्माण झाली आहे मात्र आशा गंभीर बाबिकडे स्थानीक प्रशासना सह वरिष्टाचे दुर्लक्ष होताना दिसते गाव तिथे शाळा यानुसार चारगांव येथील ८०० लोकवस्थिच्या गावात दोन शिक्षकी १ ते ४ वर्गा पर्यन्त शाळा निर्माण करण्यात आली त्या शाळेत ४४ विद्याथी शिक्षण घेत आहेत मात्र जीर्ण जुन्या इमारती मुळे सर्व १ ते ४ वर्गातिल विद्यार्थी एकाच वर्गात शिक्षण घेण्याची वेळ निर्माण झाली आहे
तीन वर्षाच्या या काळात या भागातील वरिष्टा अधिका ऱ्याचे दुर्लक्ष होताना दिसते त्यामुळे एकाच वर्गाति १ ते ते ४ वर्गातिल ४४ विद्यार्थी याचा शैक्षणिक क्षेत्राचा खेळखंडोबा होताना दिसतो त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाईल की क़ाय अशी शंका व्यक्त केलि जात आहे मात्र स्थानीक प्रशासना सह वरिष्टा अधिकारी या बाबत वरिष्टा कडे पाठपुरावा केल्याचे सांगितले जात असले तरी तीन वर्षा पासून जि प शाळा चारगांव येथील अशी वर्गखोलिचि अवस्था का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे या ८०० लोकवस्थिच्या गावात गेली अनेक वर्षा पासून जि प शाळेचि निर्मिति करण्यात आली हा भाग जंगल व्याप्त असून या भागात ७०/- टक्के लोक आदिवासी समुदायाचे आहेत त्यामुळे या शाळेत बहुतांश आदिवाशी विद्यार्थी प्राथमिक शिक्षण घेताना दिसतात मात्र शिक्षणाची सद्याची व्यवस्था योग्य दिसत नसल्याने या भागातील जनतेत मराठी शाळा बाबत रोष व्यक्त केला जात आहे तेव्हा जीर्ण इमारत वर्ग खोल्याचा अभाव आदि करनास्थव शिक्षणाचा खेळखडोंबा होत असलेल्या जि प शाळा याकडे नव्या इमारतिची व्यवस्था निर्माण करुण द्यावी अशी मागनी जोर धरत आहे ……
……………………………..
जुन्या वर्गखोलीचे निर्लेखन करण्यासाठी बांधकाम विभाग व जिल्हा परिषदेकडे प्रस्ताव पाठवलेला आहे आणि तो लवकरच मंजूर होईल.
खंडारे गटशिक्षणअधिकारी प स सावली
…………………………..
ग्रामपंचायत ठराव दोनदा शिक्षण विभागाला व जिल्हा परिषद कडे दिलेला आहे जुन्या वर्ग खोली इमारतीचे निर्लेखन करून नवीन इमारत बांधून देण्यात यावी अन्यथा विद्यार्थ्यांना घेऊन आंदोलन करण्यात येईल
सरपंच ..
ज्योती बहिरवार चारगाव
……………………………