मराठी भाषा संवर्धनासाठी महाविद्यालयीन तरुणांनी प्रयत्न करावा. : डॉ. संजय लाटेलवार
मराठी भाषा संवर्धनासाठी महाविद्यालयीन तरुणांनी प्रयत्न करावा. : डॉ. संजय लाटेलवार
चंद्रपूर : ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ चंद्रपूर द्वारा संचालित डॉ. खत्री महाविद्यालय, तुकुम, चंद्रपूर येथे मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त ‘मराठी भाषा संवर्धन काळाची गरज’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. एम. काकडे, प्रमुख मार्गदर्शक प्रा. संजय लाटेलवार, शिवाजी महाविद्यालय राजुरा, राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. माधव गुरनुले, मराठी विभाग प्रमुख प्रा. सुरेश लोनबले, डॉ. आर. यु मरमाई मंचावर उपस्थित होते.
प्रमुख मार्गदर्शक प्रा. डॉ. संजय लाटेलवार यांनी मराठी भाषेविषयी विस्तृत माहिती सांगितली. इंग्रजी भाषा जागतिक स्तरावरील ज्ञानभाषा असली तरी मराठी भाषिक विद्यार्थ्यांनी मराठी भाषा टिकविण्याकरिता समाजात वावरतांना मराठी भाषेचा जास्तीत जास्त उपयोग करावा. मोबाईलद्वारे संदेश पाठविताना मराठी भाषेचा उपयोग करावा. मराठी भाषेचा शब्द भंडार समृद्ध आहे प्रत्येक शब्दातून विशिष्ट असा अर्थ लक्षात येतो.. अध्यक्षीय मार्गदर्शन करतांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे एम काकडे म्हाणाले कि, विद्यार्थी जीवनात मराठी भाषा उत्तम प्रकारे आत्मसात केली तर शिक्षण घेताना ज्ञान आत्मसात करणे सहज शक्य होते. इतर भाषेतील ज्ञानग्रहण करण्याकरीता अडचण येत नाही. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख प्रा. एस आर लोनबले यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन डॉ. आर. यु. मुरमाडे यांनी केले तर आभार प्रा. दिलीप बावने यानी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. आर. एम. पाटील, डॉ. रवी वाळके, डॉ. जी. के. जिभकाटे, प्रा. संतोष कावरे, डॉ. ज्योत्स्ना मोहितकर, श्रीमती अलका निखाडे यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाला बहुसंख्य विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.



