जि. प. प्राथमिक शाळा करगाव येथे महात्मा गांधीजी स्मृतिदिन तथा हुतात्मा दिन संपन्न

जि. प. प्राथमिक शाळा करगाव येथे महात्मा गांधीजी स्मृतिदिन तथा हुतात्मा दिन संपन्न
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा करगाव येथे दि. ३० जानेवारी २०२३ ला महात्मा गांधीजी यांचा स्मृतिदिन घेण्यात आला. तसेच देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ आदर व्यक्त करण्यासाठी मौन पाळून श्रद्धांजली अर्पण करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सदर कार्यक्रम बाबाराव मेश्राम मुख्याध्यापक यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. आदेश मानकर स. शि. यांनी महात्मा गांधीजी यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला.
तसेच देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण करणाऱ्या हुतात्म्यांची सविस्तर माहिती दिली. संचालन थानिक नैताम स. शि. यांनी केले तर आभार प्रदर्शन दिपाली मुळे या विद्यार्थिनीने केले.