जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घनोटी तुकूम येथे मकरसंक्रांत दिनानिमित्त व गणराज्य दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

जिल्हा परिषद, प्राथमिक शाळा घनोटी तुकूम प. स. पोंभुर्णा येथे मकरसंक्रांत दिनानिमित्त दि. 27 जानेवारी 2023 ला दुपारी 12.00 वाजता महीला हळदी कुंकू, माता पालक सुसंवाद सभा, महीलांना प्रबोधन, महीलांचे स्पर्धा, आणि विद्यार्थ्यांचा खरी कमाई इत्यादी कार्यक्रम घेण्यात आले या कार्यक्रमाचे उद्घाटक सो. यशोदाताई ठाकरे सरपंच घनोटी तुकूम यांनी केले विशेष अतिथी म्हणून सौ. वैशालीताई बुरांडे उपसरपंच, पोलिस पाटील सौ.प्रेमिलाताई गव्हारे, आशा वर्कर श्रीमती, सुलभाताई कुडमेथे , कु.संगीता गणवीर मॅडम विषय तज्ञ, कु. शुभांगी हुमणे मॅडम उपस्थित होत्या वरील सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ शालश्रीफळ देऊन स्वागत व सत्कार मा. कु.संध्या मदन बाहे मुख्याध्यापिका यांच्या हस्ते करण्यात आले मा. संगीता गणवीर मॅडम यांनी स्त्रि पुरुष समानता व पास्को कायद्या विषयी मार्गदर्शन केले कु. शुभांगी हुमणे मॅडम यांनी खर्रा तंबाखू खाण्याचे दुष्परिणाम महीलांना समजावून सांगितले महीला साठी गीत गायन स्पर्धा, उखाणे स्पर्धा , डाॅन्स स्पर्धा घेण्यात आले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. कोमल जगन्नाथ ढोंगे व आभार प्रदर्शन कु. सानिया उमेश टेकाम यांनी इंग्रजी मध्ये केले.यानंतर रात्री ठिक 8.00 वाजता सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आले
या कार्यक्रमाचे उद्घाटक मा सौ. यशोदाताई संदिप. ठाकरे सरपंच ग्रामपंचायत घनोटी तुकूम
सह उद्घाटक – मा सौ.वैशालीताई साईनाथ बुरांडे उपसरपंच ग्रामपंचायत घनोटी तुकूम
अध्यक्ष – मा श्री. संतोष महादेव उईके शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष घनोटी तुकूम
उपाध्यक्ष – मा श्री. रूपेश तुळशीराम सातपूते शालेय व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष घनोटी तुकूम आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य वSMC सदस्य उपस्थित होते आणि यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उदघाट न करण्यात आले, शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या नक्कल , गायन, एकपात्री भुमिका अभिनय-, डाॅन्स , व नाटीका करून संपूर्ण गावकऱ्यांना मंत्रमुग्ध केले. संपूर्ण SMC समितीतील पालक वर्ग मिळून संपूर्ण गावकऱ्यांना स्नेह भोजन दिले या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी कु.संध्या मदन बाहे मुख्याध्यापिका व श्री.गिरीधर एम. कोडापे स.शिक्षक तसेच गावातील जेष्ठ नागरिक व युवक वर्ग महीला बचत गट , पुरूष बचत गट व समस्त गावकरी मंडळीनी मिळून शाळेला 70320 रुपये देणगी स्वरुपात प्राप्त करून दिले.