सर्वधर्मीय सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन

सर्वधर्मीय सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन
सहाय्यक धर्मादाय आयुक्त कार्यालय चंद्रपूर अंतर्गत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा समिति चंद्रपूर यांच्या सौजन्याने चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व देवस्थान, न्यास, सेवाभावी, सामाजिक, शैक्षणिक संस्थांच्या उपक्रमाने गरीब, आत्महत्याग्रस्त, आर्थिक दुर्बल घटस्फोटित, शेतकरी, मजूर व इतर सर्वांच्या मुलामुलींचा सामुहिक विवाह सोहळा 2023 चे आयोजन शनिवार दिनांक 4 मार्च 2023 रोजी दुपारी 12-00 वा. चांदा कब ग्राउंड चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यामध्ये येणाऱ्या सर्व जोडप्यांचे लग्न लाऊन देण्यात येणार असुन वधू वर यांना लग्नाचे कपडे, फेटा ओढणी, अलंकार, नवदाम्पत्यास गृहपायोगी भेट वस्तू, चहा, नाष्टा, लग्नाचे विशिष्ट जेवणाची सोय असणार आहे. विवाहबद्ध झालेल्या नवदाम्पत्याना शासकीय नोंदणीकृत प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या सामुदायिक विवाह सोहळ्याचा लाभ घेण्यासाठी वधू वर यांचे आधार कार्ड, त्यांचा जन्मतारखेचा दाखला, रहिवाशी प्रमाणपत्र, शेती असल्यास शेतीचा सातबारा, यापूर्वी लग्न झाले नसल्याचे शपथपत्र, आणि लग्न स्वेच्छेने करित असल्याचे संमतीपत्र ही कागदपत्रे आवश्यक आहेत. या सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याची संकल्पना श्री महेंद्र के. महाजन, धर्मादाय आयुक्त महाराष्ट्र राज्य मुंबई यांची असून पर्यवेक्षक श्रीमती ए. एस. कोल्हे, आहेत तसेच या सोहळ्याचे प्रमुख मार्गदर्शक श्रीमती पी. के. करवंदे, सहाय्यक धर्मदाय आयुक्त चंद्रपूर हे आहेत. हा सामुहिक विवाह सोहळा सर्व धर्माच्या लोकांकरिता आयोजीत करण्यात आला असून इच्छुक वर वधू यांच्या पालकांनी 15 फेब्रुवारी 2023 पर्यंत नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. नाव नोंदणी करिता श्री आर. आर. ठाकरे, अधीक्षक, सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, चंद्रपूर मो नं 9284301685, श्रीमती डी. बी. गायकवाड, अधीक्षक, सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय चंद्रपूर 8999865964, श्री आर. ए. मडावी. निरीक्षक सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय चंद्रपूर 8275300185, श्री आर. आर. उपासे निरीक्षक सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय चंद्रपूर 9049687565, यांचेशी संपर्क संपर्क साधावा. तसेच सहाय्यक धर्मादाय आयुक्त कार्यालय चंद्रपूर फोन नंबर 07172-255427 येथे संपर्क करून अधीक मार्गदर्शन प्राप्त करून घेता येईल. या सामुहिक विवाह सोहळ्याचा लाभ इच्छुकांनी अवश्य घेण्याचे आवाहन आयोजन समितीचे अध्यक्ष सौ शोभाताई पोटदुखे, चंद्रपूर 9422136501,
उपाध्यक्ष श्री कैलाशजी खंडेलवाल बलारपूर 9422137376, सचिव श्री नीलम रा चलवर चिमूर 9767573613, कोष्याव्यक्ष श्री रामदासजी वाघदरकर, बलारपूर 9422151163, तसेच अॅ ड. राजेश्वर एन. ढोक. चंद्रपूर 9423691529, श्री सुधाकर कडु, आनंदवन वरोरा 9850343299, अॅड. मनोज ज. काकडे राजुरा, 9822573662, अॅड. रीतेश अ. सिंघवी चंद्रपूर 9822360031, अॅड. आशिष गुप्ता चंद्रपूर 9421724649, श्री उत्तमराव मोहितकर, कोरपना 9923232412, श्री हरविंदरसिंग धुन्नाजी चंद्रपूर 9370311099, श्री योगेश पांडे भद्रावती मो 9822182311, श्री हर्षवर्धन सिंघवी चंद्रपूर 9423419190, सुरेश कोल्हे चंद्रपूर 9421877188 श्री मसूद अहमद शेख अहमद राजुरा 9226722400, उद्धव पुरी गडचांदूर 9764412434 यांनी केले आहे. 15 फेब्रुवारी पर्यंत विवाह नोंदणी करणे बंधनकारक आहे असे आयोजकाकडून सांगण्यात आले आहे.