नवेगाव भुज येथे क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव साजरा
नवेगाव भुज येथे क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव साजरा …..
सावली ( लोकमत दुधे)
जि.प.उच्च प्राथमिक शाळा नवेगाव भुज येथे शालेय उपक्रमाअंतर्गत मुलामुलींचे दोन दिवशीय शालेय बालक्रीडा व सांस्कृतिक महोत्सव घेण्यात आला.
पहिल्या दिवशी वर्ग एक ते सात च्या सर्व विद्यार्थ्यांचे मैदानी खेळ त्यात कबड्डी,खो खो,रिले,दौड, अळथळा शैयत चमचा गोळी,दोरीवरच्या उड्या, इत्यादी मैदानी सामने घेण्यात आले त्यात सर्व विद्यार्थ्यांने उस्फूर्त सहभाग घेतला.
दुसऱ्या दिवशी सर्व मुलांमुलींचे सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले त्यात वैयक्तिक व सामूहिक नृत्य,नकला एकपात्री प्रयोग, मुकनाट्य, लघुनाट्य इत्यादींचा समावेश होता.
कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला मालार्पण करून करण्यात आली.
सदर महोत्सवात सहभागी सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या सहभागाबद्दल बक्षीस देण्यात आले.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्यद्यापक कैलास वाकडे,अनिता आईंचवार,किरण मानकर,जगदीप दुधे,बालस्वामी कुमरे,उमाकांत दोडके,आकाश कुकुडकर व गावकऱ्यांनी अथक परीश्रम घेतले……