करगांव येथे सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न
करगांव येथे सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा करगांव येथे शालेय विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम नुकतेच संपन्न झाले. विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांचा विकास होऊन सृजनशीलतेला चालना मिळावी, कलेत आवड निर्माण होऊन शिस्त, त्याग, अहिंसा, सत्य, शील या मूल्यांचे संवर्धन करण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा करगांव येथे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे उद्घाटन मंगेश मोहोड पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन पाथरी यांनी केले. सहउद्घाटक म्हणून कल्पनाताई वाढई सरपंच ग्रा.पं. करगाव या उपस्थित होत्या. तर अध्यक्ष म्हणून कैलास लांडगे अध्यक्ष शा.व्य.स. हे होते.
तर प्रमुख पाहुणे म्हणून धनराज लांडगे उपसरपंच ग्रा.पं.करगाव, वासुदेव सिडाम SRPF, नंदकिशोर तोडासे लाईनमन, राजेंद्र अढीया शिक्षणप्रेमी, लोमेश बोरेवार केंद्रप्रमुख पाथरी, सपना मोहुर्ले उपाध्यक्ष शा. व्य.स., प्रमोद चौधरी, अविनाश येरमे ग्रा. पं. सदस्य, हेमलता लेनगुरे ग्रा. पं. सदस्य, विजयाश्री गंडाटे ग्रा. पं. सदस्य, सविता मोहुर्ले ग्रा. पं. सदस्य, हिरुताई चौधरी सदस्य शा. व्य. स., संजीवनी बोबाटे सदस्य शा. व्य. स., ज्योती राऊत सदस्य शा. व्य. स., वर्षा भोयर सदस्य शा. व्य. स., उज्वला रामटेके सदस्य शा. व्य. स., देविदास लोणारे सदस्य शा. व्य. स., हेमचंद तरारे सदस्य शा. व्य. स., निकेश कुंभरे सदस्य शा. व्य. स., नरेंद्र चावरे सदस्य शा. व्य. स., रामरतन रोहनकर पो.पा., चुडीराम कोलते अध्यक्ष तंटामुक्ती समिती, धोंडूपंत नागोसे अध्यक्ष गुरुदेव सेवा मंडळ, शरद नागापुरे, लोकेश चौधरी, मोरेश्वर गंडाटे, विलास नागोसे, नंदू नैताम, रामभाऊ नागोसे, विद्या चौधरी, सचिन मोहुर्ले, जनार्दन चौधरी, राजेश्वर खोब्रागडे यासोबतच गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
शिष्यवृत्ती परीक्षा व नवरत्न स्पर्धेमध्ये करगांव शाळेतील यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचे भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. उद्घाटक मंगेश मोहोड पोलीस निरीक्षक पो. स्टे. पाथरी यांचा शाळेच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक बाबाराव मेश्राम यांनी केले. त्यांनी शाळेच्या प्रगतीचा आलेख सविस्तर सांगितला. संचालन आदेश मानकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन विलास नागोसे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता थानिक नैताम सहा. शिक्षक, सर्व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, तसेच गावातील होतकरू तरुण-तरुणींनी हातभार लावला.कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.