*गुलाब शहा बाबा कान्व्हेंट येथे सांस्कृतिक कार्यक्रम*
*गुलाब शहा बाबा कान्व्हेंट येथे सांस्कृतिक कार्यक्रम*
“२६ जाने.प्रजासत्ताक दिनाच्या पुर्व संध्येवर.,विद्यार्थांच्या.विविध स्पर्धाचे आयोजन”
*सावली*:(बाबा मेश्राम/लोकमत दुधे)__: स्थानिक गुलाब शहा बाबा कान्वेंट सावली येथे २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधुन आज (२५ जाने) सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले, कार्यक्रमाचे उद्घाटन ,सावलीचे माजी नगराध्यक्ष विलास यासलवार, तर अध्यक्ष स्थान सावलीच्या नगराध्यक्षा सौ. लताताई लाकडे यांनी भुषविले,,यावेळी नगरसेविका निलम सुरमवार, प्रकाश सुरमवार, गुलाब शहा बाबा कान्वेंटचे मुख्याध्यापक संदीप मेडपल्लीवार आदी उपस्थित होते,
गेल्या अडीच वर्षामध्ये कोरोना संकटामुळे देशासह राज्यातील शाळा ,कान्हेंट,महाविद्यालये बंद होती, विद्यार्थी घरीच राहुन आनलाईन शिक्षणाचे धडे अन्डा्ईड मोबाईल वरती घेत होते,या द्वारे शिक्षण दिले जात.असले तरी विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांवा वाव मिळत नव्हता, त्यांच्या अंगी असलेले विविध गुण दिसून येत.नव्हते, २०२२ वर्षात कोरोना संकट कमी झाले आणि विविध सण,उत्सव,धार्मिक, सामाजिक ,कार्यक्रम घेतल्या जात आहेत, २६ जानेवारी ,गणराज्य दिनाच्या पुर्व संध्येवर गुलाब शहा बाबा कान्वहेंट येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले, यात एकल.नृत्य, समुह नृत्य, देशभक्ती गिते , आदी कार्यक्रम घेण्यात ,लहान चिमुकल्या मुलांच्या नृत्याने प्रमुख अतिथि सह ,पालक प्रेक्षक वर्गात आनंदी वातावरण निर्माण झाले.
सांस्कृतिक कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक संदीप मेडपल्लीवार, हर्षा मेडपल्लीवार, शिक्षिका संगिता गेडाम, मनिषा वाढ ई, कु.पगडपल्लीवार, कु ,गेडाम यांनी परिश्रम घेतले ,यावेळी विद्यार्थांच्या आई वडीलासह शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संदीप मेडपल्लीवार, हर्षा मेडपल्लीवार, संगीता गेडाम,हेमा गेडाम ,सुष्टी येनगंदेवार,मनिषा वाढ ई,शिल्पा पगडपल्लीवार ,आदी