विद्यार्थ्यांनी खेळ व कलेच्या माध्यमातून आपला विकास साधावा-सागर कांबळे
विद्यार्थींनी खेळ व कलेच्या माध्यमातून आपला विकास साधावा व आपले व महाविद्यालयाचे नाव उंचवावे असे प्रतिपादन श्री सागर कांबळे नायब तहसीलदार सावली यांनी केले.राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालय सावली येथे केले. दिनांक २३जानेवारी २०२३ ते २५ जानेवारी २०२३ या काळात होणाऱ्या सांस्कृतीक व क्रीडा महोत्सवास आजपासून प्रारंभ झाला या प्रसंगी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. सदर महोत्सवात विद्यार्थींच्या कला गुणांना वाव मिळावा यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. बौध्दिक स्पर्धां मध्ये , रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा, पोश्टर स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा व प्रश्न मंजुषा इ. स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. क्रीडा प्रकारात कबड्डी, खोखो, क्रिकेट, गोळा फेक, रस्सीखेच, धावणे इत्यादी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या असून सांस्कृतिक स्पर्धेसाठी गायन, प्रहसन, सामुहिक नृत्य, एकल नृत्य इत्यादी कला प्रकार ठेवण्यात आले आहे. भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष श्री अनिल भाऊ स्वामी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांनी सर्व कला प्रकारात भाग घेवून आपली कला सादर करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ अशोक खोब्रागडे यांनी केले. यावेळी मंचावर भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे सदस्य श्री संजय पाटील श्रुंगारपवार, तालूका पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री. सुरज बोम्मावार तसेच ज्येष्ठ पत्रकार श्री उदय गडकरी उपस्थित होते.सदर कार्यक्रमात महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.किरण बोरकर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.अशिष शेंडे यांनी केले.



