*महाविद्यालयस्तरीय रायेसो विशेष शिबिर संपन्न*
भारत शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित राष्ट्रपिता महात्मा गांधी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सावलीच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजना विभाग तथा ग्राम पंचायत जिबगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १६ जानेवारी ते २२ जानेवारी या कालावधीत वैज्ञानिक दृष्टिकोन व ग्रामविकासाकरिता युवाशक्ती ही संकल्पना समोर ठेवून मौजा जिबगाव येथे महाविद्यालय स्तरीय विशेष शिबिराचे आयोजन जिल्हा परिषद शाळा जिबगाव येथे करण्यात आले होते.
शिबिराच्या उद्घाटनाचे अध्यक्ष भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष मान.अनिल भाऊ स्वामी हे होते विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन शिक्षणाबरोबरच ग्रामीण जीवनाशी समरस व्हावे, श्रम प्रतिष्ठा वाढावी त्याचबरोबर विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठीच अशा प्रकारच्या शिबिराचे आयोजन करण्यात येते असे ते अध्यक्ष स्थानावरून बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून पुरुषोत्तम चुधरी, सरपंच ग्रामपंचायत जिबगाव, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक वायकोर सर, ग्रामपंचायत सदस्य राकेश गोलेपल्लीवार,महाविद्यालयाचे प्राचार्य तसेच कार्यक्रमाचे आयोजक डॉ. अशोक खोब्रागडे खोब्रागडे उपस्थित होते.
सदर सात दिवशी शिबिरामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रम,सिकलशेल जनजागृती, व आरोग्य शिबिर,नव मतदार जनजागृती व नोंदणी कार्यक्रम, श्रमदान,गावाची ग्रामसफाई, सांस्कृतिक कार्यक्रम असे विविध उपक्रम राबविण्यात आले. आयोजित शिबिरामध्ये जवळपास १०० महाविद्यालयीन विद्यार्थी आणि विद्यार्थिनी सहभाग नोंदविला.
समारोपीय कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मान. राजाबाळ पाटील संगीडवार हे होते.तर प्रमुख अतिथी म्हणून जिबगावचे सरपंच पुरुषोत्तमजी चूदरी, ग्रामपंचायत सदस्य राकेश गोलेपल्लीवार हे होते.
शिबिराच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अशोक खोब्रागडे, कार्यक्रमाधिकारी डॉ.दिलीप कामडी, डॉ.रामचंद्र वासेकर, सरपंच तथा सदस्य तसेच गावातील नागरिक, तंटामुक्ती अध्यक्ष सोमाजी आगरे, पोलीस पाटील नामदेवजी कोतपल्लीवार, तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.