पाणठेला,हातगाळी व्यवसायकांना काही वेळेची शिथिलता द्या:- रुचित वांढरे
पाणठेला,हातगाळी व्यवसायकांना काही वेळेची शिथिलता द्या:- रुचित वांढरे
उपासमारीची बाब समोर येत आहे..
विदर्भ 24 न्यूज़
प्रतिनिधी/गडचिरोली :–भारत देशा पाठोपाठ जगा मध्ये कोरोणा या महामारीचे थैमान माजले असताना, देशा मध्ये मोठे आर्थिक संकट ओढवले आहे.सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये विदर्भातील मागासलेला जिल्हा म्हणजे गडचिरोली जिल्हाचे नाव समोर येतो.गडचिरोली जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात साधन संपत्ती असून त्याचा वापर नसल्याने कुठलेही कंपनी किंवा फॅक्टऱ्या नाही आणि जिल्ह्यामध्ये कंपनी फॅक्टरया नसल्याने कुठलाही प्रकारचे जिल्हयात रोजगाराची संधी नाही, अश्यातच गडचिरोली जिल्ह्या मध्ये काही बेरोजगार युवक,लोक पानठेल्याच्या माध्यमातून किंवा ढकलगाळी च्या माध्यमातून कशे-बसे स्वतःचा आणि स्वतःच्या परिवाराचा उदारनिर्वाह करीत असल्याचे मत रुचित वांढरे यांनी व्यक्त केले आहे.
जिल्ह्यामध्ये संचारबंदी दरम्यान काही गोष्टीना शिथिलता दिलेले आहे या दरम्यान पाणठेला व ढकलगाळी धारकांना काही नियमावली ठरवून व त्यांना काही मर्यादित वेळ देऊन शिथिलता देण्यात यावी नाही तर याच्या व्यतिरिक्त त्यांना बेरोजगारी भत्ता मनुन 7ते 8हजार रूपये महिना देण्यात यावा अशी मागणी रुचित वांढरे यांनी केली आहे.पुढे रुचित वांढरे यांनी प्रसिद्धीपत्रकातून म्हटले आहे की गोर गरीब लोकांना अन्न धान्य वाटप करत असताना त्यांच्या लक्षात असे आले की गडचिरोली शहरात काही लोक अशे आहेत की ज्यांना कमाई केल्या शिवाय त्यांना दोन वेळेचे अन्नही मिळत नाही मनुन अश्या लोकांची आर्थिक व सामाजिक बाजू लक्ष्यात घेऊन यांच्या करिता उपाय योजना आखावे अशी मागणी रुचित वांढरे यांनी मा.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मा.पालकमंत्री विजय भाऊ वडेट्टीवार व मा.जिल्हाधिकारी दीपक सिंघला, यांच्या कडे इमेल च्या माध्यमातून केली आहे



