वाचनालयाला पुस्तके भेट देऊन साजरा केला वाढदिवस …..
वाचनालयाला पुस्तके भेट देऊन साजरा केला वाढदिवस …..
*सोनुले परिवाराचा उपक्रम *
सावली (बाबा मेश्राम/ लोकमत दुधे )
सावली नगरातील प्रतीष्टीत व्यापारी श्री. देवानंद वासूदेव सोनूले यांच्या मुलगा चि. आयुश याचा वाढ़दीवस महात्मा जोतीराव फुले वाचनालयास पुस्तके देऊन नुकताच साजरा करण्यात आला चि. आयूशच्या हस्ते पुस्तके व विद्यार्थ्यांना पेन चे वाटप करण्यात आले . या वेळी देवानंद सोनूले यांनी वाचनालयातील विद्यार्थ्यांना कसल्याही अडचणी आल्यास त्या सोडवीन्यास सदैव तत्पर राहू असे मत व्यक्त केले . पुस्तकांचा स्वीकार वाचनालयाच्या वतीने प्रदिप लेनगूरे , नितेश रस्से वाचनालयाचे स्वयमसेवक रवी वाढई , महेश मांदाळे , महेश गुरनूले, सुरज आवळे भास्कर शेंडे सर्व युवक युवती वाचनालयातील विद्यार्थी यांनी स्वीकार केला …..



