*विश्वशांती विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय युवा दिन साजरा*
*विश्वशांती विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय युवा दिन साजरा*
प्रतिनिधी
भारत शिक्षण प्रसारक मंडळ सावली द्वारा संचालित विश्वशांती विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालयात राष्ट्रनिर्माते,युगपुरुष स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय युवा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
सर्वप्रथम स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला दीपप्रज्वलन आणि पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक माननीय रवींद्र मुप्पावार सर होते.*”खुदको कमजोर समजना सबसे बडा पाप हैं”* भारतात युवकांची संख्या जास्त असून आज देश घडविण्याची,आणि मजबूत करण्याची संपूर्ण जबाबदारी युवकांची आहे असे अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.

विचार पिठावर पाहुणे म्हणून विद्यालयाचे पर्यवेक्षक राऊत सर, ज्येष्ठ शिक्षक सुपले सर, खर्चे मॅडम, सहाय्यक शिक्षक किशोर संगीडवार सर उपस्थित होते.
जयंती निमित्त कार्यक्रमाचे मार्गदर्शक म्हणून कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक प्रा.झोडे यांनी *”जीवनात जोखीम पत्करा,जिंकलात तर नेतृत्व कराल, हरलात तर मार्ग दाखवाल*” असे विचार मांडून मार्गदर्शन केले.स्वामी विवेकानंद यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला.

कार्यक्रमाचे संचालन सहाय्यक शिक्षक प्रदीप कोहळे सर यांनी केले तर आभार कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक प्रा.धनंजय गुरनुले यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयाचे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी वृंदाचे सहकार्य लाभले.



