मादगी समाजाचे राज्यस्तरीय वधू वर परिचय मेळाव्याचे आयोजन
मादगी समाजाचे राज्यस्तरीय वधू वर परिचय मेळाव्याचे आयोजन
दिवंगत भजनदास आलेवार बहुद्देशीय संस्था गडचिरोली च्या वतीने मादगी समाजाचे राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन दिनांक 15 जानेवारी 2023 रोज रविवारला गोंडवाना कलादालन केंद्र पोटेगाव रोड गडचिरोली येथे करण्यात आलेले आहे. आज विवाह जोडण्याकरिता अनेक अडचणी पालकांना असतात. वधु वर पाहत असताना आर्थिक खर्च सुद्धा येत असतो. विवाहकरीता मुल मुली सापडत नाहीत. ही बाब लक्षात घेऊन या संस्थेने हा नवा उपक्रम हाती घेतलेला आहे. सदर उपक्रमाच्या अंतर्गत या संस्थेने आपली सामाजिक बांधिलकी दाखविलेली आहे. या पूर्वी सुध्दा संस्थेने नावीन्यपूर्ण असे उपक्रम राबविले आहेत. सदर कार्यक्रम हा राज्यस्तरीय असल्यामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वधू वर आपला परिचय देण्याकरिता येत आहेत.तरी आपल्या परिसरातील मादगी समाजाच्या बांधवांनी विवाह करण्यास इच्छुक असलेल्या आपल्या मुलांमुलींची नोंद करावी.सदर आयोजित कार्यक्रमाला जास्तीत जास्त समाज बांधवांनी उपस्थित राहावे अशी विनंती संस्थेचे अध्यक्ष संजय पवार, उपाध्यक्ष विकास गोरडवार,सचिव प्रणय गोरडवार तसेच समस्त पदाधिकारी यांनी केलेली आहे.



