*सावित्रीबाई फुले जयंती महोत्सव उत्साहात साजरा
*सावित्रीबाई फुले जयंती महोत्सव उत्साहात साजरा*
*भव्य रक्तदान शिबिर, ४० रक्तदात्याने दिले रक्तदान”
” ज्ञानज्योती फाऊंडेशन व माळी समाजाचा उपक्रम+
*सावली(बाबा मेश्राम)::ज्ञानज्योती फाऊंडेशन व माळी समाजाच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली,सावली शहराच्या मुख्य रस्त्यावरुन जयंती रैली काढण्यात आली, यात विविध वेषभूषा धारण केलेले बालकांनी नागरिकांचे मने जिंकली, यात सावित्रीबाई फुले, महात्मा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर ,महात्मा गांधी ,सुभाषचंद्र बोस यांच्या वेशभूषा बालकांनी धारण केली होती,शिस्तबद्ध जयंती रैलीत ,महापुरुषाचा जयघोष देण्यात आला, माळी समाजाच्या वतीने अतिशय शिस्तबद्ध आणि एकसारखे पेहराव घातलेले समाज बांधव व त्यांची मोठ्या प्रमाणात असलेली उपस्थिती लक्षणीय ठरली,बसस्थानक, डॉ आंबेडकर चौक,बाजार चौक, खादी भंडार,सावतामाळी चौकापासून सदर रैली महात्मा फुले नगरी येथे नेण्यात आली ,

सावित्रीबाई फुले जयंती महोत्सवाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते ,यात रक्तदान शिबीर सुध्दा घेण्यात आले,४० रक्तदात्याने रक्तदान करुन ,”दानात दान.रक्तदान “याची प्रचिती दिली,या सोबतच युवक,युवती करीता ” आयुष्याला नवी दिशा देणारा कार्यक्रम “घेण्यात आला.यावेळी मार्गदर्शक म्हणुन दुर्गा प्रसाद बनकर उपस्थित होते, तीन दिवसीय कार्यक्रमात विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले ,”महिलोन्नती करीता सावित्रीबाई च्या विचांराची गरज ,”यावर गोंडवाना विद्यापीठाच्या डा रजनी वाढ ई,तसेच रा.म.गा.म च्या प्रा.स्मिता राऊत यांनी मार्गदर्शन केले ,कठीण परिस्थितित चिखल,धोंडे सनातनी लोक फेकत असताना सावित्रीबाई न डगमगता आपले शैक्षणिक कार्य सुरु ठेवले ,त्या ख-या अर्थाने ज्ञानज्योती होत्या,भारताच्या पहिल्या मुख्याध्यापिका होत्या, म्हणुन त्यांच्या विचांराची गरज आज महिला आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले,

..कार्यक्रमाच्या शेवटच्या दिवशी(३जाने) ला जयंती रैली सोबतच
महात्मा ज्योतीबा फुले वाचनालयाच्या दुस-या मजल्याचे लोकार्पण तर जयंती महोत्सव मुख्य कार्यक्रमाचे उद्घाटन से.नि.मुख्या.मिरा शेंडे यांनी केले,कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ समाज सेविका शशिकला गावतुरे तर मार्गदर्शक गोंडवाना विद्यापिठाच्या डा रश्मी बंड या उपस्थित होत्या.
कार्यक्रमाची सुरुवात। छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतीबा फुले ,सावित्रीबाई फुले ,छत्रपती शाहू महाराज, डा बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस मार्लापण व दिपप्रज्जवलन करुन करण्यात आली,
….सदर कार्यक्रमात ग्रामस्वच्छता, रांगोळी सह गीतगायन व आनंद मेळावा आयोजित करण्यात आला, कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ज्ञानज्योती फाऊंडेशन व माळी समाजाने मौलाचे सहकार्य केले…



