Vidarbh24News

Latest Online Breaking News

धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी १५ हजार रूपये अनुदान

धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी १५ हजार रूपये अनुदान

नागपूर : विदर्भाच्या विकासाशिवाय महाराष्ट्र मजबूत होणार नाही. विदर्भ मजबूत तर राज्य मजबूत अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विदर्भाचे महत्त्व अधोरेखित केले. विरोधी पक्षनेते अजित पवार, रणधीर सावरकर आणि समीर कुणावर यांनी मांडलेल्या प्रस्तावावर झालेल्या चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री शिंदे यांनी विदर्भ व मराठवाड्यासाठी मोठ्या घोषणा केल्या. त्यामध्ये धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी हेक्टरी १५ हजार रूपयांच्या अनुदानाच्या घोषणेचा समावेश आहे.

सत्ता गेली त्यातून विरोधी पक्ष सावरले नाही अशी कोपरखळी मारत मुख्यमंत्री शिंदे यांनी भाषणाला सुरुवात केली. समृद्धी महामार्ग आता गडचिरोलीपर्यंत वाढवणार असल्याची घोषणा त्यांनी केली. सदर महामार्गामुळे शेतकरी आपला शेतमाल १२ तासात मुंबईला पोचऊ शकतील. समृद्धीमुळे नागपूर व वर्धा ही शहरे लॉजिस्टिक्स शहरे म्हणून विकसित होणार आहेत.

विदर्भ मजबूत तर महाराष्ट्र मजबूत- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही नवीन धोरणाची घोषणा केली. राज्यातील मागासलेल्या तालुक्यांसाठी नवीन धोरण, नीती आयोगाच्या धर्तीवर मित्र नावाची संस्था आणि वस्त्रोद्योग धोरण २०२३ ते २०२८ तयार करण्यात येणार आहे.

आघाडी सरकारने मंजुरी न दिलेले विदर्भ, मराठवाडा व उत्तर महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळाला पुनर्स्थापित करण्यासाठी केंद्राला प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे. 

 

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!