कायदा व सुव्यवस्था राखण्याचे सावली पोलिस ठाणेदाराचे आव्हाहन
*३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर सावली पोलीस सज्ज*
दरवर्षी 31 डिसेंबर (थर्टी फर्स्ट). ला रस्ते अपघात होत असतात. नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी लोकं पार्टी करित असतात. काही नवयुवक मद्य प्राशन करून गाडी वेगाने चालवीत असतात तर कुणी स्टंटबाजी करीत असतात यामुळे अनेक अपघात होत असतात. दरवर्षी चां अनुभव बघता सावली पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक आशिष बोरकर यांचे कडून ३१ डिसेंबर च्या पार्श्वभूमीवर ३० आणि ३१ डिसेंबर रोजी सावली पोलिस स्टेशन हद्दीत नाकाबंदी मोठ्या प्रमाणात करण्यात येणार आहे. पोलिस स्टेशनच्या हद्दीत दोन गाड्या सतत पेट्रोलिंगसाठी राहणार आहेत. परवानगी शिवाय परिसरात कोणताही कार्यक्रम करू नये. मद्य प्राशन करून गाडी चालवीनाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल. शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करावे.असे आवाहन पोलिस स्टेशन सावली कडून करण्यात येत आहे.



