Vidarbh24News

Latest Online Breaking News

अखिल भारतीय मादगी समाज संघटनेच्या प्रयत्नांना यश

अखिल भारतीय मादगी समाज संघटनेच्या प्रयत्नांना यश

मुख्यमंत्रांनी घेतली निवेदनाची दखल

विदर्भ 24 न्यूजचे समाज बांधवांकडून अभिंनदन

एक महिन्यापूर्वी अखिल भारतीय मादगी समाज संघटनेच्या वतीने  विदर्भातील तहसीलदारांच्या मार्फतीने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रांना निवेदन देण्यात आले. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून  प्रत्येक तालुक्यात निवेदन देण्यात आले. या निवेदनात  बँड वाजविणाऱ्या समाजाला पाच हजार रुपये आर्थिक मदत देण्यात यावी, लग्नसमारंभात बँड वाजविण्याची सवलत देण्यात यावी इत्यादी मागण्या करण्यात आल्या होत्या. या मागण्यांना माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी पाच हजार रुपये नाही पण पाच व्यक्तींना लग्नसमारंभास बँड वाजविण्याची परवानगी दिली. आजपर्यंतच्या मादगी समाजाच्या इतिहासात डोकावून पाहिजे तर ही पहिलीच मागणी पूर्ण झाली आहे. यामुळे या वंचित-पिडीत समाजाला प्रथमच न्याय मिळाला आहे. यामुळे समाजामध्ये आनंदाचे वातावरण आहे, तसेच संघटनेच्या पदाधिकार्यांमध्ये नवा जोश निर्माण आला आहे.

विदर्भ 24 न्यूज चॅनलने समाज संघटनेच्या  मागणीला वाचा फोडण्यासाठी आपल्या न्यूज पोर्टलवर वारंवार बातम्या लावून मागणी रेटून धरली त्यामुळे न्यूज पोर्टलचे  मादगी समाजबांधवांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.

 

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!