लोखंडी सळाखांची चोरी करणारे गुन्हेगार गजाआड
लोखंडी सळाखांची चोरी करणारे गुन्हेगार गजाआड
दिनांक २५/१२/२२ रोजी पहाटे ०३:३० वा सावली पोलीसांच्या रात्रगस्तीदरम्यान १) राहुल मोरेश्वर चौधरी वय २९ वर्ष २) शशांत दिवाकर भोयर वय २९ वर्ष दोन्ही रा. चकपिरंजी ता सावली ३) विकास सुरेश आभारे वय २७ वर्ष रा. केशरवाही ता सावली हे चारचाकी वाहन टाटा मेगा क एमएच ३४ बीजी २२८२ ने ०७ लोखंडी सळाख बंडल संशयीतरित्या वाहतुक करतांना मिळून आले. सदर मालाबाबत त्यांना विचारपुस केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. सदर प्रकरण संशयास्पद वाटून आल्याने ते वाहतुक करीत असलेले लोखंडी सळाख एकूण ०७ बंडल की. ३५,०००रू व नमूद वर्णनाचे चारचाकी वाहन की.अं २,००,००० रू असा एकूण २,३५,००० रू चा मुद्देमाल जप्त करून कारवाई करण्यात आली.
सदर दिवशीच सकाळी अं ०९:०० वा दरम्यान सावली येथील सार्वजनीक बांधकाम विभागाच्या कार्यालय व निवासस्थान इमारतीचे बांधकाम सुरू असलेल्या इमारतीचा चौकीदार नामे निलकंठ चौधरी हा पो.स्टे ला येउन त्याचे बांधकाम साईट वरील ०७ बंडल लोखंडी सळाख चोरी गेल्याची तक्रार घेवून पो.स्टे ला आला. त्यावरून पो.स्टे सावली चोरीचा गुन्हा नोंद करण्यात आला.सदर गुन्हयातील चोरी गेलेला मुद्येमाल हा पहाटे कारवाई दरम्यान मिळून आलेले लोखंडी सळाख हे त्याच साईटवरचे आहेत असे निदर्शनास आले. करीता आरोपी १ ) राहुल मोरेश्वर चौधरी वय २९ वर्ष २) शशांत दिवाकर भोयर वय २९ वर्ष दोन्ही रा.चकपिरंजी ता सावली ३) विकास सुरेश आभारे वय २७ वर्ष रा. केशरवाही ता सावली यांना ताब्यात घेवून कसून चौकशी केली असता त्यांनी नमूद मुद्देमाल चोरी केल्याचे कबुल केले. वरून नमूद तीन्ही आरोपीतांना सदर गुन्हयात अटक करून त्यांची न्यायालयीन कोठडीकरीता रवानगी केली आहे.
सदरची एकूण कारवाई मा. श्री रविंद्रसिंह परदेशी साहेब पोलीस अधिक्षक चंद्रपूर, मा. रिना जनबंधू मॅडम अपर पोलीस अधिक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री मल्लीकार्जुन इंगळे साहेब यांचे मार्गदर्शनात व ठाणेदार श्री आशिष बोरकर पोलीस स्टेशन सावली यांचे नेतृत्वात सहा.पोलीस उपनिरीक्षक श्री पितांबर खरकाटे, दिलीप मोहुर्ले, पो.शि. विश्वास नखाते, धिरज पिदूरकर यांनी केली असून गुन्हयाचा पुढील तपास पोउपनि अजय मडावी हे करीत आहेत.



