नवीन वर्षाच्या पर्वावर केंद्र आणि राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना गिफ्ट
नवीन वर्षाच्या पर्वावर केंद्र आणि राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना गिफ्ट
महात्मा फुले प्रोत्साहन योजनेचे 50000 रुपये आणि पिएम किसान योजनेचे 2000 रुपयेच्या दोन्ही याद्या प्रसिद्ध
-kyc केल्यानंतर दोन दिवसात 50,000/- रूपये खात्यात जमा होणार
शेतकरी मित्रांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी असून पन्नास हजार रुपये प्रोत्साहन अनुदानाच्या या जिल्ह्यानुसार गावानुसार तालुक्यानुसार आज दिनांक रोजी जाहीर झालेले आहेत. महात्पमा फुले प्रोत्साहन अनुदान योजनेची तिसरी यादी प्रकाशित करण्यात आलेली आहे.
शेतकऱ्यांमध्ये निर्माण होणारा रोश आणि प्रतीक्षा पाहता 23 डिसेंबर 2022 रोजी व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे विद्यमान मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची बैठक पार पडली होती. सदर बैठकीमध्ये दिनांक 24 डिसेंबर 2022 रोजी याद्या प्रकाशित करण्याचे निर्देश देण्यात आले होते.
आज याद्या प्रकाशित करून पुढील केवायसी प्रक्रिया सुरू करण्यात सुरुवात झाली आहे. ही केवायसी प्रक्रिया 31 डिसेंबर पर्यंत करण्याची सूचना देण्यात आलेल्या आहेत.
आता याद्या पाहण्यासाठी तुम्हाला नजीकच्या शेतकरी सहकारी सोसयटी, गावची चावळी किंवा आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन व याद्या पाहायला मिळणार आहेत. सदरच्या यादीमध्ये जर आपलं नाव असेल तर आपल्या जवळच्या सीएससी सेंटरवर जाऊन तुम्हाला आधार कार्ड वरून तुम्हाला त्याची केवायसी करावी लागणार आहे.
यावर्षी पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे आधीच शेतकऱ्यांचा पिकाचे नुकसान झालेले असून पन्नास हजार रुपये प्रस्थान अनुदान यादी जाहीर केल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
शेतकऱ्यांनी यादीमध्ये जर नाव असेल तर त्यांनी आपली केवायसी पूर्ण करून घेणे गरजेचे आहे सदरची केवायसी पूर्ण करून घेण्यासाठी शेतकऱ्यांनी त्यांच्या आधार कार्ड घेऊन नजीकच्या सीएससी सेंटरवर जाऊन त्या ठिकाणी त्यांची केवायसी पूर्ण करून घेणे गरजेचे आहे.
केवायसी पूर्ण झालेल्या शेतकऱ्यांना नवीन वर्षा अगोदर त्यांच्या खात्यामध्ये पन्नास हजार रुपये प्रोत्साहन अनुदान जमा होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना लवकरात लवकर आपली केवायसी पूर्ण करावी.
केवायसी पूर्ण केल्यानंतर शेतकऱ्यांना फक्त दोन दिवसांमध्ये पन्नास हजार रुपयांची मदत त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. ज्यांचे यादीमध्ये नाव आले नाहीत त्यांनी आपल्या नजीकच्या बँकेमध्ये संपर्क करावा.
पिएम किसान योजनेचे 2000/- जमा होणार त्याचीही यादी आलेली आहे
पिएम किसान योजनेची तेराव्या हप्ताची यादी प्रसिद्ध झालेली आहे. नजीकच्या आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन तपासून पाहावे. पी एम किसान योजना ही केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली योजना असून या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 हजार रुपये दिले जातात. सदर योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पी एम किसान या पोर्टल वरती नोंदणी करणे आवश्यक आहे. परंतु बरेच दिवसापासून नवीन शेतकऱ्यांसाठी नोंदणी बंद होती तर ती नोंदणी सुरू झाली असून आपण ऑनलाइन पद्धतीने पीएम किसान योजनेची नवीन नोंदणी सुरू झाली आहे.
प्रथमतः शेतकऱ्यांनी नवीन नोंदणी करण्या अगोदर तुम्हाला तुमच्याजवळ सातबारा, राशन कार्ड, बँकेचे पासबुक आणि आधार कार्ड हे महत्त्वाचे दस्तऐवज तुमच्याजवळ असणे आवश्यक आहे. तुमचा आधार कार्ड ला लिंक असणारा मोबाईल नंबर तुमच्याजवळ असला पाहिजे. ही सर्व कागदपत्रे घेऊन नजीकच्या आपले सरकार सेवा केंद्रावर (CSC) जावे आणि आपली नोंदणी पीं एम किसान योजनेच्या पोर्टलवर करावी. केंद्र सरकार कडून वर्षाचे 6000/– रूपये आपल्या खात्यात जमा करण्याचे आव्हाहन करण्यात येतं आहे.



