विविध जिल्ह्यातील अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी परीक्षा संदर्भात प्रश्न केले उपस्थित..
विविध जिल्ह्यातील अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी परीक्षा संदर्भात प्रश्न केले उपस्थित..
– विद्यार्थ्यांनी सोशल मीडिया वरून केले आंदोलन..
विदर्भ 24 न्यूज़ जिल्हा प्रतिनिधी/गडचीरोली: –31 मे ला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. उद्धव ठाकरे यांनी अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतला होता. निर्णय झाल्यावर 2 दिवसानंतर मा.राज्यपाल भगतसिहं कोश्यारी, यांनी मुख्यमंत्री साहेब यांना पत्र पाठवून विद्यापीठाचा कुलगुरू मी असल्याने परीक्षाचा निर्णयाचा अधिकार माझा आहे असे म्हटले होते. पण अजूनपर्यंत अंतिम वर्षाचा विद्यार्थ्यांचा परीक्षां संदर्भात अजूनपर्यंत कुठलाच निर्णय न घेण्यात आल्याने विद्यार्थी आक्रमक झाले आहेत.
राज्यपालांनी फक्त दोन प्रश्नांची उत्तरे देनार का असे विद्यार्थ्यांनी म्हटले आहे.
1. ज्या वेळी मुख्यमंत्री साहेब यांचे सोबत VC झाली त्या वेळी राज्यपालांनी विद्यापीठ कायदा 2016 ची मांडणी का केली नाही ?
2. विद्यार्थ्यांच्या परीक्षा नकी घ्या पण ती ही वेळ नाही एखाद्या कायद्या पेक्षाही आरोग्य खूप महत्वाचे आहे आणि जर राज्यातील एकाही विद्यार्थ्याला कोरोना ची लागण झाली तर राज्यपाल जबाबदारी घेणार का?
नाही तर मग विद्यार्थ्यांच्या समाध्या राजभवणार बांधायला तयार रहा, राज्यपालांच्या हाट्टामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात टाकणार असाल तर तुमाला हा महाराष्ट्र कधीच माफ करणार नाही,असे प्रश्न उपस्थित करत या बेजबाबदार निर्णयाचा राज्यातील विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावरून आंदोलन करून जाहीर निषेध केला आहे..



