उसेगाव येथे नवरत्न स्पर्धेचे आयोजन ….
उसेगाव येथे नवरत्न स्पर्धेचे आयोजन ……
सावली ( लोकमत दुधे
प.स.सावली ,केंद्र जिबगाव च्या वतीने जि.प.ऊ. प्रा. शाळा ऊसेगाव येथे नवरत्न स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आद. श्री खंडारे साहेब गटशिक्षणाधिकारी प.स. सावली, उद्घघाटक आद. श्री. चक्रधर दुधे सरपंच ग्रा.प. ऊसेगाव तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री. सुनील पाल उपसरपंच ऊसेगाव, श्री. अमरदीप रामटेके अध्यक्ष शा. व्य.स., श्री. विलास मुसद्दिवार उपाध्यक्ष शा. व्य.स., श्री. घोंगे सर प्रभारी केंद्रप्रमुख , श्री. निरे सर, श्री. वायकोर सर, श्री. रत्नाकर भोयर शा. व्य.स.स., सौ. संगीता घोनमोडे शा. व्य.स.स., सौ पूजा ताई मेश्राम शा. व्य.स.स. उपस्थित होते.
संचालन जि. प. ऊ. प्रा. शाळेच्या विद्यार्थिनी कुमारी रीया आवारी व कुमारी अवंती पाल यांनी, तर आभार श्री. कोकाटे सर यांनी मानले.
नवरत्न स्पर्धेत स्वयंस्फुर्त भाषण, वाद विवाद, बुद्धिमापन, एकपात्री भूमिकाभिनय, चित्रकला, स्वयंस्फुर्त लेखन, सुंदर हस्ताक्षर, स्मरणशक्ती, कथाकथन अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धेतील विजेत्यांना नोटबुक व पेन देऊन गौरविण्यात आले.
श्री. कोकाटे सर मुख्याध्यापक व त्यांचे सहकारी सर्व शिक्षकवृंद यांनी खूप मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वी केला ….



