*नरभक्षी वाघाचा त्वरित जेरबंद करा ….. खास.अशोक नेते.
*नरभक्षी वाघाचा त्वरित जेरबंद करा ….. खास.अशोक नेते.
* खासदाराची निलसनी पेठगाव ; रुद्रापुर ;खेड़ी येथे भेट ; आर्थिक मदत *
* घटना स्थळाची केली पाहणी *
*सावली*
तालुक्यातील.वाघाचे वारंवार हल्ले होत असुन महिनाभरातील आठवड्यात तीन लोकाना आपला जीव गमवावा लागला यात दोन शेतकरी व एक महिला मजुराचा समावेश आहे यात रुद्रापुर येथील बापुराव कांबळे,खेडी येथील स्वरुपा येलट्टीवार यांचा सलग बळी गेला तर आठवडाभरापुर्वी निलसनी पेठगाव येथील कैलास गेडेकर याचा बळी गेला त्यामुळे तालुक्यात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे ,त्यामुळे वाघाचा तात्काळ बंदोबस्त करुन नरभक्षी वाघाला त्वरित जेरबंद करावे अशी मागणी चिमूर – गडचिरोली क्षेत्राचे लोकप्रिय खासदार अशोक नेते यानी गोसे कार्यालय विश्राम गृहात आढावा बैठकी दरम्यान वन अधिका ऱ्यांना सूचना केल्या तालुक्यात वाघाची मोठी दहशत निर्माण झाली असून जनजीवन भयभीत होत आहे महिनाभरात दोन पुरुषा सह एका महिलेला आपला जीव गमवावा लागला याची गंभीर दखल घेत आज रोजी खसदारानी तालुक्याचा दौरा केला आणि आढावा बैठकीच्या माध्यमातुन वन अधिका ऱ्याना सूचना देऊन वाघाचा त्वरित बन्दोबस्त करावे अशी सूचना दिली वाघाच्या हल्याची गंभीर समस्या लक्ष्यात घेत खासदारानी या भागाची पाहणी करण्यासाठी तात्काळ दौरा केला आणि वनअधिका ऱ्या सोबत आढावा बैठकीचे आयोजन गोसे विश्राम भावनात केले, त्यावेळी खासदार अशोक नेते ड़ी एफ़ ओ . खाडे ,ठाणेदार आशिष बोरकर तालुकाध्यक्ष अविनाश पाल महामंत्री सतीश बोम्मावार निखिल सुरमवार नीलम सुरमवार छाया शेंडे मयूर गुरनुले राकेश विरमलवार मनोज अम्रजवार प्रसाद जकुलवार प्रकाश गड्डमवार आदि भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते . तालुक्यात वनात वाढत असलेल्या वाघाच्या संखेत मोठी वाढ निर्माण झाली,शेतकऱ्यांना, मजुरांना उदारनिर्वाह करण्यासाठी शेतात कामाला.जावे लागते,परंतु वाघाच्या दहशतीमुळे परिसरातील जनता भयभीत झालेली आहे, तसेच वाघाच्या हल्ल्यात अनेकांना बळी गेला तर काही जखमी झालेले आहेत, त्यामुळे वनविभागाने नरभक्षी वाघाचा ताबोडतोब बंदोबस्त करावा, तसेच शेतपिकाचे नुकसान करणा-या रानडुक्कर, ईतर वन्यप्राण्यांच्या सुध्दा बंदोबस्त करावा अशा सुचना खासदारांनी यावेळी दिल्या..



