*कवठी येथे आरोग्य मेळावा संपन्न
*कवठी येथे आरोग्य मेळावा संपन्न.*
*शिबीराला भरभरून प्रतिसाद.*
*कवठी प्रतिनिधी*(राकेश घोटेकार)
तालुक्यातील आरोग्य उपकेंद्र कवठी येथे आरोग्य मेळावा संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे उद्घाटक व अध्यक्ष म्हणून मा. सौ.कांताबाई बोरकुटे सरपंच ग्रापं कवठी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी विलास बट्टे उपसरपंच आरोग्य समुदाय अधिकारी सागोरे मँडम,राऊत मँडम, वनकर मँडम, माटे सर,मनिषा कोसरे ग्रापं सदस्य टिकाराम म्हशाखेत्री तूमस अध्यक्ष, सर्व आशासेविका, अंगणवाडी सेविका कंकलवार, सहारे व आदी ऊपस्थित होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन सरपंच बोरकुटे यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्थाविक वनकर यांनी केले यात माटे यांनी लोकांना मार्गदर्शन केले. सागोरे यांनी कार्यक्रमात आरोग्या विषयी योग्य मार्गदर्शन केले . एकूण 230 नागरिकांनी तपासणी केली.यात नेत्र तपासणी व चष्मे वाटप करण्यात आले. स्त्रिरोग,कृष्ठरोग,क्षयरोग,असंसर्ग जयरोग,विविध आजारांवर तपासणी व उपचार करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिस्टर मेंढळकर यांनी तर आभार बोगावार यांनी मानले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आरोग्य उपकेंद्र कवठीचे कर्मचारी वृंद मदतनिस माधुरी बोबाटे यांनी अथक परिश्रम घेतले