*सावली तालुक्यात प्रथमच नवीन मराठी गाण्याची शूटिंग*
*सावली तालुक्यात प्रथमच नवीन मराठी गाण्याची शूटिंग*
+ग्रामीण भागातील तरुण कलेच्या मार्गावर+
*सावली(बाबा मेश्राम)…
सावली तालुक्यासाठी अभिमानास्पद गोष्ट अशी की निफंद्रा गेवरा परिसरात “प्रेमात मी तुझ्या” या गाण्याचे शुटींग करण्यात आले, सदर शुटिंग स्वप्नस्पुर्ती प्राड्क्शन यांनी वतीने करण्यात आले..
पुर्वी पासुनच ग्रामीण भागात लोककला अस्तित्वात आहे, नाकट,दंडार, पोवाडा यांच्या माध्यमातून हि अभिनय ,गाणे म्हटल्या जात होते, असेच ग्रामीण भागातून तरुण वर्ग या अश्या कलेच्या मार्गावर जाणे म्हणजे खूप मोठी कौतुक करण्या सारखी गोष्टच, या कामाकारिता खूप मेहनत आणि हिम्मत लागते. ग्रामीण भागात थिएटर उभे करणे म्हणजे साधी गोष्ट नाही, पुर्वी गाण्यासाठी, कींवा अभिनय करण्यासाठी पुणे,मुबई ,कोल्हापूर गाठावे लागत असे ,संधी मिळवण्यासाठी खुप प्रयत्न करावे लागत ,त्यात बरोबर या क्षेत्रातील प्रशिक्षण घ्यावे लागत असे, यातून आर्केस्टा , कींवा नाटकातून आपल्या गुणांना प्रेक्षकासमोर सादर करावे लागते..
बदलत्या काळानुसार आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर.,करून आपले गाणे मग स्वतः रेकार्ड करून यु ट्युब, सोशल.मिडिया वाट्स अप,फेसबुक, इंस्टाग्रामवर टाकत असतात ,कला गुणांना ईथुन सुध्दा मोठा प्रतिसाद मिळत असतो ,त्यासाठी कोणत्या पिक्चर.,अल्बमची गरज नाही तर.यु ट्यूब चा वापर करून कला दाखवली जाते.
त्या साठी या कलाकारांच कितीही कौतुक केल ते कमीच, प्रथमच या प्रकारच गाणं आपल्या भागात शूट झालं असल्याने जिथं तिथ या गाण्याच्या प्रदर्शनाची चर्चा चालू आहे.
अश्या या कामाकरिता खुप मेहनत आणि बजेट ची गरज असते, त्यामुळे या क्षेत्रात काम करायला खूप विचार करणारे लोक सुद्धा आपल्याला मिळतात, पण सर्व गोष्टींचा विचार करत, स्वप्नस्पूर्ती या प्रोडक्शन नी या कामासाठी हिम्मत दाखवली, हे तर खूप मोठ धाडसच, या प्रोडक्शन मधी सर्व सदस्य कोणत्या नी कोणत्या क्षेत्रात जॉब करत या कामाला वेळ काढून हे काम पूर्ण करत आहेत म्हणजे आपल्या वेळातला वेळ काढून हे काम पूर्ण करणे म्हणजे खूप मोठा संघर्षच,
म्हणतात , काम करण्याकारिता जीवन जगा , आणि अस जीवन जगा की त्यात तुमची आवड निवड असेल, आपल्या जीवनातले स्वप्न आपण पूर्ण करू, तेच स्वप्न पूर्ण करण्याकारिता सावली तालुक्या मध्ये एक प्रोड्क्शन सुरु झालंय, तो म्हणजे स्वप्नस्पुर्ती प्रोडक्शन
प्रेक्षकांना या प्राड्क्शन च्या वतीने येणाऱ्या प्रेमात मी तुझ्या या गाण्याला सबक्राईब,शेअर करून प्रसिद्धी द्यावी असे प्राड्क्शन च्या वतीने आवाहन करण्यात येत आहे…