उत्कर्ष योगेंद्र आदे आला जिल्हा कराटे स्पर्धेत प्रथम

उत्कर्ष योगेंद्र आदे आला जिल्हा कराटे स्पर्धेत पटकविला प्रथम क्रमांक
भारत शिक्षण प्रसारक मंडळ, सावली द्वारा संचालित विश्वशांती विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय सावली येथे इयत्ता १० वी मध्ये शिकत असलेला उत्कर्ष योगेंद्र आदे याने तालुका स्तरावर प्रथम क्रमांक पटकावून जिल्हा स्तरावर निवड करण्यात आली होती. दिनांक ८/१२/२०२२ ते १०/१२/२०२२ दरम्यान झालेल्या चंद्रपूर क्रिडा संकुलामध्ये पार पडलेल्या जिल्हा स्तरीय कराटे चॅम्पियन स्पर्धेत उत्कर्ष ने जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकावून यश संपादन केले आहे.
जिद्द, चिकाटी, मेहनत व समयसुचकतेमुळे त्याला हे यश प्राप्त करता आले आहे. उत्कर्ष योगेंद्र आदेनी प्राप्त केलेले हे यश सावली तालुक्याला एक गौरवाचा स्थान प्राप्त करून देणारे असल्याने त्याचे सर्वत्र कौतुक आणि अभिनंदन होत आहे.
उत्कर्षने आपल्या यशाचे श्रेय आई -वडील, भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष, सचिव, संचालक मंडळ, मुख्याध्यापक, क्रिडा शिक्षक, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना दिले आहे.