राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालयाच्या वतिने बाबासाहेबना अभिवादन …..
राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालयाच्या वतिने बाबासाहेबना अभिवादन …..
सावली ( बाबा मेश्राम )
राष्ट्रपिता महात्मा गांधी कला, वाणिज्य विज्ञान महाविद्यालय येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन
करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य माननीय डॉ.अशोक खोब्रागडे सर होते. या प्रसंगी बोलताना ते म्हणाले की, डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या देशाला अनेक देणग्या दिल्या.त्यातलीच एक म्हणजे अतिशय उत्तम अशी भारतीय राज्यघटना आणि त्याचे मान राखणे हे आपल्या सर्वांचे कर्त्यव आहे. आणि दुसरा म्हणजे उत्तम असा हिंदू कायदा हिंदू समाजाला दिला आणि तिसरा म्हणजे हजारो वर्षे अपमनास्पद परिस्थितीत पडलेल्या दिन दलीत बांधवांचा स्वाभिमान जागा केला. डॉ. आंबेडकर यांनी विचार आणी कार्य देशाच्या उभारणीत महत्व पूर्ण आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. स्मिता राऊत यांनी केले. तर आभार राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ.रामचंद्र वासेकर यांनी मानले.या प्रसंगी कॉलेजचे सर्व प्राध्यापक वृंद शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते ….



