*सत्कार होणे हि माझ्या कार्याची पावती.- स्वच्छता दुत परेश तावाडे*

सत्कार होणे ही कार्याची पावती….स्वच्छता दुत परेश तावाडे*
विदर्भ 24 न्युजने घेतली स्वच्छता दुताची विशेष मुलाखत
देशाच्या अनेक उच्च पदस्थ, समाज, संस्था, चालविणा-या गणमान्य व्यक्तीचा सत्कार समारंभ असतो, पण सावली गावात मी स्वच्छतेचे कार्य करत असतो, रस्त्या वरील पडून असलेला केरकचारा उचलून विल्हेवाट लावणे हे माझे कार्य, स्वच्छतेच्या कार्याची पावती म्हणून माझा सत्कार आहे ,असे मत स्वच्छतादुत परवाडे यांनी केले आहे. विदर्भ 24 न्युज शी बोलत होते.
नुकतेच सावली येथे वाचनालयाचा वर्धापन दिन सोहळा पार पडला कार्यक्रमात सर्वधर्म समभावाचे अध्यक्ष तथा स्वच्छता दुत परेशभाईचा सत्कार करण्यात आला, स्वच्छतेचे पुजारी गाडगेबाबा राष्ट्र, संत तुकडोजी महाराज, यांनी आपले गाव स्वच्छ असावे त्यासाठी हातात झाडू घेतला ,त्यांची प्रेरणा घेऊन परेश भाऊ तावाडे राष्ट्रीय महा मार्ग पोस्ट आफिस, पोलीस स्टेशन, गोबार चौक, जयभीम वाचनालय येथील केरकचारा साफ करून स्वहस्ते करत असतो, पालक मंत्री मुनगंटीवार यांच्या हस्ते या पूर्वी सत्कार करण्यात आला,भारतात स्वच्छ भारत स्पर्धा आयोजित केले, शहर, ग्रामीण स्वच्छतेसाठी पुरस्कार आयोजित केले.परेशभाई हे कोणत्याही पुरस्काराची अपेक्षा करू नका, आपण आपल्या घेतलेल्या स्वच्छतेच्या वसेशी गुंतून, हे कार्य नित्याने सुरू आहे, स्वच्छतादूत च्या विशेष मुलाखती दरम्यान विदर्भ 24 चे मुख्य संपादक रुपचंद लाटेलवार ,कार्यकारी संपादक बाबा मेश्राम , संपादक सुधाकर दुधे,संपादक लोकमत दुधे यावेळी उपस्थित होते, विदर्भ 24 चे वतीने पुढील स्वच्छता कार्यासाठी शुभेच्या देण्यात आल्या