नक्षल्यांकडून निष्पाप आदिवासी इसमाचा बळी,
नक्षल्यांकडून निष्पाप आदिवासी इसमाचा बळी,
– नक्षल्यांना गावबंदी करण्याचे पोलिस विभागाचे आवाहन..
विदर्भ 24 न्यूज
जिल्हाप्रतिनिधी / गडचिरोली : एटापल्ली तालुक्यातील येत असलेल्या पोलिस मदत केंद्र गट्टा जां. मधील गुंडजुर येथील रहिवासी रवी जुरू पुंगाटी ( 28वर्ष ) याची पोलीस खबरी असल्याच्या संशयावरून नक्षल्यांनी निर्दयीपणे हत्या केली आहे. काल 11जून रोजी रात्रो 7 वाजताच्या सुमारास राहत्या घरी कुटुंबासह झोपलेला असताना मध्यरात्री दरम्यान 15 ते 20 शस्त्रधारी नक्षली त्याच्या घरी आले. रविला झोपेतुन उठवून गावाच्या बाहेर बळजबरीने घेवून गेले होते.आज कोठी – गट्टा जां. मार्गावर सकाळी नातेवाईकांना रवि याचा मृतदेहच आढळून आला. रवी निष्पाप असून त्याचा निर्दयीपणे खून करण्यात आला आहे.यामुळे ग्रामस्थांनी नक्षल्यांना गावबंदी करावी,पोलिस विभाग सर्वतोपरी सहकार्य करेल,असे आवाहन पोलिस विभागाच्या वतीने करण्यात आले आहे . रवी पुंगाटी याच्या डोक्यात गोळी झाडून हत्या करण्यात आली.त्याच्या मागे पत्नी सरीता व 3 मुले आहेत 5 वर्षांची मुलगी आशा , दोन वर्षांचा मुलगा सवर्ण आणि 3 महिन्यांचा साजन अशी त्यांची मुलाची नावे आहेत, रवी हा शेतमजुरी करून आपला कुटुंब चालवायचा, त्याला अत्यंत कमी वयाची मुले आहेत.त्यांच्या उपजिविकेसाठी तो दिवसरात्र राबायचा.मात्र या लहान बालकांचीसुध्दा नक्षल्यांना दया आली नाही. क्रुर नक्षल्यांनी स्वत:च्या स्वार्थासाठीच निश्पाप आदिवासींचा छळ सुरू केला आहे. या घटनेचा विविध गावातील नागरीकांनी विरोध केला आहे. निश्पाप नागरीकांविशयी काहीही देणे -घेणे नसल्याने निघृणपणे खून करीत आहेत. यामुळे गावकऱ्यांनी पुढे येवून नक्षल्यांना गावबंदी करावी,असे आवाहन पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी केले आहे.



