विश्वशांती विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालयात ‘ महापरिनिर्वाणदिन ‘ साजरा

विश्वशांती विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालयात ‘ महापरिनिर्वाणदिन ‘ साजरा
प्रतिनिधी :
भारत शिक्षण प्रसारक मंडळ, सावली द्वारा संचालित विश्वशांती विद्यालय तथा उच्चमाध्यमिक विद्यालय, सावली येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा ६६ वा महापरिनिर्वाणदिन साजरा करण्यात आला.
सर्वप्रथम महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार आणि दीपप्रज्वलन करुन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाचे पर्यवेक्षक माननीय ए. के. राऊत सर , प्रमुख अतिथी म्हणून विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक सुपले सर,सहाय्यक शिक्षक मेश्राम सर, के. एस. संगिडवार सर मंचावर उपस्थित होते.
महापरिनिर्वाणदिनी कार्यक्रमाचे मार्गदर्शक म्हणून कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक डी. पी. दुधे सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून बाबासाहेबांनी दिलेले शैक्षणिक व सामाजिक विचारावर प्रकाश टाकला. ” लोकशाहीचे दोन शत्रू म्हणजे हुकुमशाही आणि माणसा- माणसांत भेद मानणारी संस्कृती “असे विचार त्यांनी मांडले.
याप्रसंगी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी मार्गदर्शनपर भाषणे व गीत सादर केले. कार्यक्रमाचे संचालन कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक आर. व्ही. केदार सर तर आभार धनंजय गुरुनुले सर यांनी आभार मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.