*भारतीय संविधानातील सामाजिक समरसता समजून घेण्याची गरज – डॉ. के. प्रेमकुमार*
*भारतीय संविधानातील सामाजिक समरसता समजून घेण्याची गरज – डॉ. के. प्रेमकुमार*
श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, राजुरा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महाविद्यालयातील सांस्कृतिक विभाग, मराठी विभाग व ग्रंथालय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने व्याख्यानाचे आयोजन “भारतीय संविधान व सामाजिक समरसता” या विषयावर करण्यात आले. सदर कार्यक्रमाला आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव तथा माजी जिल्हा परिषद सदस्य मा. अविनाश जाधव अध्यक्ष स्थानी उपस्थित होते. प्रमुख वक्ता म्हणून डॉ. प्रेमकुमार खोब्रागडे, नाटककार तथा समाजसेवक उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून प्रा. व्ही. के. शंभरकर, प्रा. डॉ. संतोष देठे, प्रा. डॉ. संजय लाटेलवार, प्रा. डॉ. सारिका साबळे मंचावर उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाला मार्गदर्शन करताना डॉ. के. प्रेमकुमार यांनी भारतीय संविधान व सामाजिक समरसता या विषयावर आपले मनोगत व्यक्त करतांना संविधानातील विविध प्रकारच्या तरतुदी आणि प्रावधनांविषयी आपले मत मांडताना आर्टिकल १३, १७, १९ व २१ मध्ये करण्यात आलेल्या विविध तरतुदी समजावून सांगितल्या. त्याच प्रमाणे भारतीय संविधान समजून घेण्यासाठी आधी आपल्याला आपला देश समजून घ्यावा लागतो. आपल्या देशात पूर्वपार चालत आलेल्या परंपरा, रूढी आणि चालिरीतींचा विचार करावा लागतो. संविधान कर्त्यांना आपल्या देशातील तत्कालीन परिस्थीचा आणि भवष्यकाळाचा विचार करून आपल्या देशात समानता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सामाजिक समरसता निर्माण व्हावी यासाठी संविधान समजून घेण्याची गरज व्यक्त केली.
मा. अविनाश जाधव यांनी अध्यक्षीय मनोगतातून समयोचीत मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. लाटेलवार यांनी मांडले. सदर कार्यक्रमाचे संचालन कु. प्रतिक्षा वासनिक यांनी केले तर आभार प्रज्वल बोबडे यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एम. वारकाड यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. लाटेलवार यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण सांस्कृतिक समिती सदस्य व महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व सर्व विद्यार्थी यांच्या सहकार्याने यशस्वीपणे संपन्न झाला.



