शहरात घर बांधकामाचा धडाका ; नळावर पम्प लाऊन पाण्याची चोरी …..
* खाजगी नळधारकांचा प्रताप *
* न प प्रशासनाचे दुर्लक्ष *
* एकिकडे पाण्याची चोरी तर दुसरीकडे पान्याचा दुष्काळ *
सावली ( लोकमत दुधे )
घर बांधकामासाठी ऑन लाईन आणि ऑफ चि सुविधा असताना या घर बांधकाम सुविधेकडे दुर्लक्ष करीत स्थानिक प्रशासनाची कोणतीही परवानगी न घेता सावली मुख्यालयात बेधड़क बेपरवाना घर बांधकामाचा धडाका सुरु झाला असून आशा गंभीर बाबिकडे स्थानिक न प प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसते बांधकाम कुठलेही असो त्या बाबत रितसर स्थानिक प्रशासनाला बांधकामाची परवानगी घेऊनच कामाला सुरुवात केलि जाते मात्र बांधकामाची कोणतीही परवानगी न घेता बेधड़क सावली मुख्यालयत घर बांधकामाचा सपाटा सुरु झाला असल्याचे दिसुन येत आहे शहरात नेमक्या किती घर बांधकामाला परवाना किती बेपरवाना बांधकाम याची कल्पनाही येथील प्रशासनाला नसल्याचे दिसुन येत आहे पावसाळा संपताच घर बांधकामाला मोठ्या प्रमाणात सुरवात केलि जाते त्या अधारावर सावली मुख्यालयतिल अनेक प्रभागात घर बाधकमाला सुरुवात झाली आहे मात्र घर बांधकामाची परवानगी घेणे आवश्यक असताना अनेकानी स्वताच्या मुजोरिने न प प्रशासनाची परवानगी न घेता घर बांधकामाचा सपाटा सुरु केल्याचे दिसून येत आहे सोबतच घर बांधकामाचे साहित्य वाहतुकी मार्गावर टाकून वाहतुकीला आड़थळा निर्माण केला जात असल्याने वाहतुकीची कोड़ी निर्माण होत आहे घर बांधकामासाठी पान्याची आवश्यकता आस्ताना घरगुती नळ कनेक्शनवर्ती पम्प लाऊन पाण्याची सर्रास चोरी केलि जात आहे त्यामुळे इतराना पाण्याचा पुरवठा कमी होताना दिसतो त्यामुळे पानी कमी मिळत असल्याची बोम्ब सुरु आहे पाण्याच्या चोरिचा प्रकार काही प्रभागात सुरु असताना मात्र अश्या गम्भीर बाबिकडे बांधकाम विभाग ; पानी पुरवठा वीभागाचे जाणीव पूर्वक दुर्लक्ष होताना दिसते नगरात किती घरच्या बांधकामाना सुरुवात झाली किती बांधकामाचे परवाने देण्यात आले किती घर बांधकाम मालकानी परवाने घेतले याची साधी कल्पनाही न प प्रशासनाला नसावी याबाबत शंका व्यक्त केलि जात आहे म्हणूनच बेपरवाना घर बांधकामाचा धडाका सुरु झाला असावा त्यामुळे प्रशासनाच्या सतर्कतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केला जात आहे नेहमीचा नगरात पाण्याची बोमबाबोम्ब सुरु आहे कधी साधे तर कधी फिल्टत नळ योजनेचा नेहमीचा लपंडाव सुरु असून पान्याविना नागरातिल जनता वैतागलेली असताना आणि पान्यासाठी नेहमीच जनतेला आंदोलन ; घागर काढ़न्याची वेळ निर्माण झाल्याचे अनेक उदाहरण असताना सध्या सुरु असलेल्या बेपरवाना घर बांधकामासाठी सरास घरगुती नळ कनेक्शन वर्ती पम्प लाऊन पाण्याची चोरी करण्याचा सपाटा घर बांधकाम मलकानी सुरु केल्याचे दिसुन येत आहे मात्र अशा सावली नागरातिल गम्भीर बाबिकडे स्थानिक न प प्रशासनाचे दुर्लक्ष दिसुन येत आहे शहरात ९२७ नळ कनेक्शन असून अनेक भागात पाण्याचा पुरवठा कमी असल्याची नगरवाशीयाची ओरङ आहे त्यामुळे एकिकडे पाण्याची कमतरता तर दुसरीकडे पम्प लाऊन पाण्याची चोरी सुरु असल्याचा प्रकार सुरु आहे तेव्हा बेपरवाना सुरु असलेल्या घर बांधकामावर आणि नव्या बांधकामावर पम्प द्वारे नळाचे पानी चोरना ऱ्या चोरटयावर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी जोर धरत आहे …..
………………………………
शहरात पानी पुरवठा नियमित करण्याचा पर्यन्त सुरु आहे काही तांत्रिक अड़ चनीमुळे कधी कधी पानी पुरवठा खंडित होत असतो परन्तु नळावर पंम्प लाऊन पानी चोरना ऱ्याची गय केलि जाणार नाही …
* पानी पुरवठा विभाग न प
सावली *
………………………………
शहरात ९२७ नळ कनेक्शन आहेत नेहमीचा पान्याची अनेक प्रभागात बोम्ब राहिलेली आहे पानी पुरवठा नियमित करण्याचा पर्यन्त प्रशासनाचा सुरु असून घर बांधकामासाठी पंम्प लाऊन पाण्याची चोरी करना ऱ्या वर जप्तीची कार्यवाही केलि जाईल …
* अंतबोध बोरकर
पानी पुरवठा सभापति न प सावली *
………………………………
सावली शहरात सद्या घरकुलाचे बांधकाम सुरु आहे कोणतेही बांधकाम करताना त्याची रितसर परवानगी न प प्रशासनकडू घेणे गरजेचे आहे
* नितेश रस्से
बांधकाम सभापति न प सावली *
………………………………



