विश्वशांती विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी साजरी
विश्वशांती विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी साजरी
स्थानिक विश्वशांती विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांची 132 वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक आर. एस. मुप्पावार , प्रमुख अतिथी म्हणून विद्यालयाचे पर्यवेक्षक ए. के. राऊत, मिलिंद सुपले, कु. श्वेता खर्चे,सुधाकर मेश्राम, हे होते.
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्याला उजाळा देण्यासाठी कार्यक्रमाचे मार्गदर्शक प्रदीप कोहळे यांनी एकविसाव्या शतकात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारांची आवश्यकता आणि तत्कालीन काळातील सामाजिक परिस्थिती यांची सांगड घालत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
याप्रसंगी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी मार्गदर्शनपर भाषणे व गीत सादर केले. कार्यक्रमाचे संचालन राजू झोडे तर आभार धनंजय गुरुनुले यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.