चेक दुबारपेठ येथे शेतात वाघाचा हल्ला, हल्ल्यात बैल गंभीर जखमी
गोंडपिपरी:- चेक दुबारपेठ येथे शेतात वाघाचा हल्ला दिनांक २७/११/२०२२ रोजी सकाळी १० वाजता चेक दुबारपेठ ;येथील श्री सुधाकर सिडाम हे शेतात बैल घेऊन जात असताना भाऊजी तांगडे यांच्या शेतात वाघाने बैलावर हल्ला केला यात बैलाला सोडविण्यासाठी सुधाकर सिडाम धावले असता त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न वाघाने केला या हल्ल्यात बैल गंभीर जखमी झाला



