Vidarbh24News

Latest Online Breaking News

*तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विश्वशांती उच्च माध्यमिक विद्यालय सावलीचा संघ विजयी*

*तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विश्वशांती उच्च माध्यमिक विद्यालय सावलीचा संघ विजयी*

सावली:- प्रवीणभाऊ आडेपवार माध्यमिक तथा उच्च माध्यमिक विद्यालय निफांद्रा तालुका सावली येथे दि.17/11/2022 पासून 23/11/2022 पर्यंत विविध शालेय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यात एकल आणि सांघिक स्पर्धा सुरू आहेत.
19 वर्षे वयोगटाखालील कबड्डी स्पर्धेत विश्वशांती उच्च माध्यमिक विद्यालय सावली विरुद्ध रमाबाई आंबेडकर कनिष्ठ महाविद्यालय सावली या संघात अंतिम सामना झाला. हा अंतिम सामाना खूप रोमहर्षक होईल असे बघनाऱ्याचे अंदाज होते,परंतु सुरुवाती पासूनच विश्वशांतीच्या संघाने आघाडी कायम ठेवून रमाबाई आंबेडकरच्या संघावर वर्चस्व निर्माण केले . शेवटी 07 गुणांची आघाडी घेऊन या सामन्याचा निकाल विश्वशांती उच्च माध्यमिक विद्यालय सावली च्या बाजूने लागला.विजयी संघात राहिल शेख , जयंत गुरूनुले ,सुरज बोरकुटे ,गणेश कोसरे ,पियुष कोसरे ,राहील घोगरे ,अंकुश गुरनुले आणि गणेश गेडेकर इत्यादी विद्यार्थ्यांचा सहभाग होता. प्रशिक्षक संजय गाडगे सर यांच्या मार्गदर्शनाखाली संघाने विजय साकार केला. विजयी संघाचे विश्वशांती उच्च माध्यमिक विद्यालय सावलीचे मुख्याध्यापक श्री.आर.एस.मुप्पावार सरांनी अभिनंदन केले.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!