सावलीच्या प्रणय गाडेवारची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड
सावलीच्या प्रणय गाडेवारची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड
सावलीच्या प्रणय गाडेवारची राष्ट्रीय बॅटमिंटन स्पर्धेसाठी निवड झालेली आहे. प्रणय गाडेवार हा सुशांत गाडेवार यांचा मुलगा आहे. प्रणयचे वडील कृषि अधिकारी आहेत.प्रणय गाडेवार याने नाशिक येथे झालेल्या राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत 15 वर्षा खालील स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला आहे. प्रणय राज्यस्तरीय चॅम्पियन स्पर्धेत यशस्वी ठरला या विजयामुळे त्याची पुढील महिन्यात होणाऱ्या भुवनेश्वर येथील राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेली आहे. प्रणय उर्फ लक्की याचे सर्वच स्तरावरून अभिनंदन करण्यात येत आहे



