“चंद्रपुर (MH) डिस्ट्रिक्ट सीएससी एसपीव्ही को-आपरेटीव्ह सोसायटी द्वारे मार्गदर्शन सोहळा”
“चंद्रपुर (MH) डिस्ट्रिक्ट सीएससी एसपीव्ही को-आपरेटीव्ह सोसायटी द्वारे मार्गदर्शन सोहळा”
चंद्रपुर सीएससी सोसायटी यांचे कडून सीएससी व्हीएलई सोसायटीच्या सभासदांना एक दिवसीय कार्यशाळा आयोजित केली जेणे करून सोसायटीच्या सीएससी व्हीएलई सभासदांचा व्यवसाय हा वाढवा त्यांचे उत्पन्न वाढावे याकरिता एक दिवसीय कार्यशाळा आयोजीत करून सीएससी मार्फत, UCL /आधार केंद्र मिळण्यासाठी लागणारी प्रोसेस,बँकिंग पॉइंट BC सठी लागणारे डॉक्युमेंट बद्दल माहिती,CSC चे टॉप 10 सर्व्हिसेस ( ज्यातून सर्वाधिक उत्पन्न वाढेल त्यांचे प्रात्यक्षित करून दाखविणे,ग्रामीण E-STORE मार्फत मिळणाऱ्या विविध डीलेरशीप बद्दल माहिती, तालुका स्तरीय FPO (फॉर्मर प्रोडूसर ऑर्गनायझेशन बदल माहिती, चंद्रपुर जिल्हयात सीएससी ची को-आपरेटीव्ह बँक स्थापन करणे, चंद्रपुर सीएससी सोसायटीचे सभासद वाढविणे या उदिष्टांच्या पूर्तीसाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले.
इत्यादी बाबींच्या विषयावर कृषक सभागृह पंचायत समिती, कलेक्टर ऑफिस चंद्रपूर येथे सकाळी 11 ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत ही कार्यशाळा चालली यासाठी चंद्रपुर जिल्हा सीएससी सोसायटीचे अध्यक्ष श्री विनोद एन. खंडाळे यांनी अथक परिश्रम घेतले आणी भविष्यात सीएससी सोसायटीच्या माध्यमातून सीएससी व्हीएलई यांचा फायदाच फायदा होईल यावर प्रास्ताविक केले ह्या कार्यक्रमासाठी अतिशय मोलाचे मार्गदर्शन देऊन सीएससी व्हीएलई यांचे उत्पादन वाढीकरिता सीएससी महाराष्ट्र राज्य व्यवस्थापक श्रीमान अझरुद्दीन सर, फायनान्स इंक्लुजर मॅनेजर भूषण वाघ सर, एलआयसी चे रिजनल मॅनेजर श्रीमान निमजे सर, टाटा मोटर्स चे सेल्स मॅनेजर श्रीमान रितेश सर, सीएससी जिल्हा व्यवस्थापक श्रीमान स्वप्नील सोनटक्के सर यांनी अतिशय सीएससी सर्विसेस बद्दलची प्रात्यक्षित माहिती दिली, रिलायन्स चे महाराष्ट्र राज्य मॅनेजर श्रीमान निलेश कुंभारे सर, रमजान शेख सर, आणि सीएससी सोसायटीचे उपाअध्यक्ष श्रीमान दिपक मांढरे ह्या सर्वांनी सीएससी च्या सर्विसेस बद्दल माहिती सांगण्यात आली या कार्यक्रमाचे संचालन सीएससी सोसायटीचे सहसचिव श्रीमान हबिब शेख यांनी अतिशय हुशारीने व्हीएलई च्या समस्या मांडत आणि त्या समस्या सीएससी अधिकारी टीम कडून मार्गदशन करतेवेळी सोडविण्यात आल्या. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सीएससी सोसायटीचे मेंबर सौ. ममता सारडा यांनी केले. तसेच या कार्यक्रमास जास्तीत जास्त संखेने सीएससी व्हिएलई उपस्थित होते.



