Vidarbh24News

Latest Online Breaking News

मॅजिक बस तर्फे आजपासून बाल अधिकार सप्ताह साजरा

मॅजिक बस तर्फे आजपासून बाल अधिकार सप्ताह साजरा
मॅजिक बस इंडीया फाउंडेशन स्केल प्रकल्प पवनी तर्फे मॅजिक बस कार्यक्षेत्रात येणाऱ्या विविध शाळांमध्ये बाल अधिकार सप्ताह 14 नोव्हेंबर ते 21 नोव्हेंबर पर्यन्त साजरा करण्यात येत आहे.
आज दिनांक 14 नोव्हेंबर सोमवार ला बालक दिनाचे औचित्य साधून भुयार,काकेपार व सावरला येथील विद्या कृषी विकास हायस्कूल भुयार,गांधी विद्यालय सावरला,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावरला, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काकेपार येथे मॅजिक बस जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक निक्की सर व तालुका प्रकल्प व्यवस्थापक विनोद शंभरकर यांच्या मार्गदर्शनात बाल हक्क सप्ताह अभियान आयोजित करण्यात आले.
या कार्यक्रमाचे उद्देश:-बालकांना त्यांचे अधिकाराची ओळख निर्माण करून देणे,पालक व समुदयामध्ये बालकांचे अधिकाराबाबत जाणीव जागृती करणे.स्थानिक stake holders यांचा बालकांचे विकासात सहभाग वाढविणे,बालकांचे विकास व जतन करणाऱ्या सरकारी यंत्रणेचे आभार मानून त्यांचा बालकांचे विकासात सहभाग वाढविणे.
बाल हक्क सप्ताह निमित्त समाजात बाल हक्क संदर्भात जनजागृती व्हावी या उद्देशाने विविध कार्यक्रमांचे आयोजन करून बाल हक्क सप्ताह साजरा करण्यात येत आहे,या कार्यक्रमाचे माध्यमातून विविध विषयावर विद्यार्थ्यांना आणि पालकांना माहिती देऊन समुदायात जनजागृती करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील मुख्याध्यापक व सर्व शिक्षक वृंद तसेच मॅजिक बस शाळा साहाय्यक अधिकारी वसंत पोटे व समुदाय समन्वयक पूजा वाणी, गुरुदेव सेलोकर,जगदिश मालोदे व सर्व विद्यार्थी यांचे सहकार्य मोलाचे ठरले.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!