श्रद्धाचा वाढदिवस वृक्षारोपण आणि नोटबुक-पेन देऊन साजरा
अखिल भारतीय मादगी समाज संघटना चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष *आयु. अनिल बोटकावार* यांची सुकन्या *कू. श्रद्धा अनिल बोटकावार* हिच्या वाढदिवसानिमत्त वृक्षारोपण करण्यात आले व समाजातील सर्व विद्यार्थ्यांना पेन व नोटबुक चे वितरण श्रद्धाचे हाताने करण्यात आले. वृक्षारोपण करून समाजाला एकच संदेश द्यायचा होता तो हा की, वृक्षाचे महत्व मानवी जीवनात किती आहे आणि वृक्षापासून आपल्याला ऑक्सिजन मिळते आणि सावली सुध्दा मिळते ह्याच उद्देशाने वृक्षारोपण करण्यात आले आणि श्रद्धाला त्या झाडाचे संगोपन करण्यासाठी सांगण्यात आले. समाजातील विद्यार्थ्यांना शालेय पुस्तक वाचन घेऊन पेन आणि बुक वितरीत करण्यात आले.

श्रद्धाचा वाढदिवस असा आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला.



