रान डुकरांमुळे शेतीची मोठ्या प्रमाणात नासधूस- शेतकऱ्यांची नुकसान भरपाईची मागणी
सावली:- सावली तालुक्यात मोट्या प्रमाणात धान, पिकाचे उत्पन्न घेत असून शेतकरी अतिवृष्टी, व रोगराईचा सामना करीत पीक मोठ्या शर्तीने वाढबिले,पण आता धान कापनिस आला असून येन कापणीच्या वेडात जंगलव्याप्त परिसरात रानडुकरांचा, व इतर जंगली प्राण्याचा मोठया प्रमाणात धान, मका, चना, या पिकावर हौदोस वाढला असून शेत पिकाची मोट्या प्रमाणात हानी होत आहे, जंगली प्राण्याचा उपद्रव वाढल्याने शेतकरी आपल्या शेतमालाची कटाई करीत आहेत,पण वनविभागाच्या नियमानुसार ज्यांचे नुकसान झाले असेल, पण त्यांनी शेतमालाची कटाई केली त्यांना नुकसान भरपाई मिडणार नाही,यामुडे शेतकरी बांधवा समोर मोठे संकट आले आहे
बॉक्स:- आमच्या शेतीचे मोट्या प्रमाणात नुकसान झाले आहे,अर्धे पीक रानडुकराने फस्त केले असून,त्या भीतीने आम्ही धानाची कापणी करीत असून वन विभागाचे अधिकारी म्हणतात की कापनी केल्यावर काही नुकसान भरपाई भेटणार नाही, व पंचनामे सुद्धा होणार नाही मग आम्ही काय करावे.
*मुखरू बोरकुटे शेतकरी गव्हारला*



