चंद्रपुरात तरुणाची हत्या वेगळे करून शिर धडावेगळे केले

चंद्रपूर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यात 37 (1) व (3) कलम लागू असतांना दुर्गापुरात एका युवकाची क्रूरतापूर्वक हत्या करण्यात आली. हिंदी चित्रपटात पाहावा तसे दृश्य या ठिकाणी पाहायला मिळाले. शिर धडावेगळे करुण फुटबॉल खेळण्यात आला.
7 नोव्हेंम्बरला रात्री 9.30 ते 10.30 वाजताच्या दरम्यान दुर्गापूर निवासी 35 वर्षीय महेश मेश्रामयाची 10 ते 15 जणांनी मिळून हत्या केली. दुर्गापूर मेन रोड वर हे भयावह हत्याकांड घडले, आरोपीनी आधी महेश मेश्राम याला मारहाण केली. त्यानंतर धारदार शस्त्राने त्याचं मुंडक धडावेगळे केले. आरोपी इतक्यावर थांबले नाही तर त्यांनी महेश याचं शीर पायाने फुटबॉल सारखे रस्त्यावर खेळत निघाले, असे दृश्य काही प्रत्यक्षदर्शी यांनी बघितलेयाचं असल्याची चर्चा आहे.
रक्ताच्या थारोळ्यात महेश मेश्राम याचा मृतदेह रस्त्यावर पडलेला होता तर धडापासून मुंडक हे 50 मीटर अंतरावर होते. मृतक महेश मेश्राम याच्यावर अनेक गुन्हे दाखल होते, नुकताच तो कारागृहातून बाहेर आला होता अशी माहिती आहे.
आरोपी व मृतकाचा वाद नेमका कशामुळे झाला याबाबत सविस्तर माहिती मिळाली नाही. काही आरोपीनी दुर्गापूर पोलीस स्टेशनमध्ये आत्मसमर्पण केल्याची ही माहिती सूत्रांनी दिली आहे.
घटना घडल्यावर तब्बल तास भरानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाल्याने जमावाने आपला रोष पोलिसांवर व्यक्त केला, सदर घटना ही पोलीस स्टेशनच्या काही अंतरावर घडल्याने चंद्रपूर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचे मात्र धिंडवडे उडाले आहे.
जिल्ह्यात पोलिस अधीक्षक व अप्पर पोलीस अधीक्षक हे नुकतेच रुजू झाले त्यानंतर ही घटना त्यांना आव्हान देणारी आहे, विशेष म्हणजे भर रस्त्यात असे हत्याकांड व आरोपीनी मृतकाचे मुंडके फुटबॉल सारखे खेळत नेले अशी क्रूर हत्या चंद्रपूरच्या इतिहासात पहिल्यांदा घडली. सध्या दुर्गापुरात दहशतीचे वातावरण आहे.